प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

एका अनोळखी व्यक्तीशी बोलल्याबद्दल 35 वर्षीय महिलेला कथितरीत्या झाडाला बांधून तिच्या सासरच्यांनी मारहाण (Beating) केली. ही घटना 17 सप्टेंबर रोजी रामपूरमधील (Rampur) बिलासपूर पोलीस स्टेशन (Bilaspur Police Station) अंतर्गत घडली होती. परंतु या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाल्यानंतर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. कथित व्हिडिओमध्ये एका महिलेला झाडाला बांधून तिच्या सासरच्या लोकांनी क्रूरपणे मारहाण करताना दिसत आहेत. या कृत्यामुळे महिला वेदनांनी ओरडते आणि दयेची विनवणी करताना दिसत आहे. रामपूर पोलिसांनी सांगितले की, ज्या पुरुषाशी ती महिला बोलत होती त्या व्यक्तीच्या तक्रारीच्या आधारे चार नावे आणि 19 अज्ञात व्यक्तींविरोधात IPC कलम 323, 355 , 498-A कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार तो बिलासपूरला घरी परतत असताना त्याने वाटेत त्या महिलेला पाहिले आणि संभाषण सुरू केले. एका स्थानिक ग्रामस्थाने दोघांना पाहिले आणि महिलेच्या सासरच्यांना माहिती दिली. तो माणूस पळून जाण्यात यशस्वी झाला, पण महिलेला झाडाला बांधून मारहाण करण्यात आली, असे त्याने सांगितले. महिलेचे आणि त्या व्यक्तीचे प्रेमप्रकरण असल्याच्या संशयातून मारहाण झाली आहे. या प्रकरणी 4 जणांना अटक केली आहे. हेही वाचा Uttar Pradesh: बायकोचा फोटो पोस्टरवर का नाही? मंत्री पुत्राने BDO ला बदडले

रामपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संसार सिंह म्हणाले, तक्रारदार जो मूळचा रुद्रपूर उत्तराखंडचा आहे. रामपूरला त्याची काही मालमत्ता असल्याने तो इथे येत असे. यामुळे त्याची त्या महिलेजवळ ओळख झाली आणि ते बोलू लागले. मात्र त्या महिलेच्या सासरच्या लोकांनी दोघांना एकमेकांशी बोलताना पाहिले. त्यांच्यावर हल्ला केला.  त्यांनी नंतर त्या महिलेचे तिच्याशी अफेअर असल्याचे गृहीत धरून मारहाण केली आहे.