Deoria | (Photo Credit: YouTube)

बायकोचा फोटो जाहीर कार्यक्रमाच्या पोस्टरवर दिसला नाही. त्यामुळे संतापलेल्या एका मंत्री पुत्राने चक्क बीडीओला बदडले आहे. ही घटना उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील गौरीबाजार ब्लॉक येथे घडली. उत्तर प्रदेश सरकारमध्ये पशू आणि मत्स्य राज्य मंत्री असलेल्या जयप्रकाश निषाद ( Jai Prakash Nishad) यांचे पुत्र विश्वविजय निषाद (Vishwa Vijay Nishad) यांनी ही मारहाण केल्याचा आरोप आहे. आयोजित कार्यक्रमाचे पोस्टर छापण्यात आले होते. या पोस्टर्समध्ये विश्वविजय निषाद यांच्या ब्लॉक प्रमुख असलेल्या पत्नी अनीता निषाद यांचा फोटो नव्हता. त्यावरुन वाद सुरु झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, उपस्थितांनी कार्यक्रमस्थळी असलेल्या खुर्च्या फेकल्या, कार्यक्रमाचा मंडपाची नासधूस केली. या सर्व राड्यामध्ये मंत्रीपुत्रांनी चक्क बीडीओ अधिकाऱ्यालाच बदडले. संजय कुमार पांडेय असे बीडीओचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, स्थानिक शासकिय कार्यालयाकडून करीब कल्याण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ही घटना घडली.

सोशल मीडियावर सदर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत पशू आणि मत्स्य राज्य मंत्री असलेल्या जयप्रकाश निषाद यांचे पुत्र विश्वविजय निषाद हे बीडीओ संजय कुमार पांडे यांना मारहाण करणाताना पाहायला मिळते आहे. निषाद यांच्या काही सहकाऱ्यांनी कार्यक्रमात धक्काबुक्की आणि तोडफोडही केली. पोस्टर्सही फाडली. ही घटना घडली तेव्हा मारहाणीसोबतच आक्षेपार्ह भाषेचाही वापर झाला. (हेही वाचा, हिमाचल मध्ये नितीन गडकरी यांच्या समोर राडा, SP नी सुरक्षा अधिकाऱ्यांच्या कानशिलात लगावली)

व्हिडिओ

व्हिडिओ

बीडीओ संजय कुमार पांडेय यांनी म्हटले आहे की, मंत्री पूत्र विश्वविजय निषाद हे आपल्या सहकाऱ्यांसोबत एकत्र आले. त्यांनी ब्लॉक प्रमुख असलेल्या आपल्या पत्नीचा फोटो पोस्टरवर का नाही असे विचारत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आम्ही आम्ही त्याचे स्पष्टीकरण दिले तेव्हा त्यांनी रागाने पोस्टर्स फाडले तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली. पांडेय यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी फआर काही सांगण्यास नकार दिला. मात्र, शासकीय अधिकाऱ्यांसोबत काहीसे गैर्वर्तन केल्याचे सांगितले.