हिमाचल मध्ये नितीन गडकरी यांच्या समोर राडा, SP नी सुरक्षा अधिकाऱ्यांच्या कानशिलात लगावली
Nitin Gadkari | (Photo Credits: Facebook)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या स्वागतासाठी दाखल झालेल्या मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांची सुरक्षेत तैनात असलेल्या सुरक्षा अधिकारी आणि कुल्लूच्या एसपी गौरव दरम्यान जोरदार राडा झाला. हेच प्रकरण आता समोर आले आहे. अचानक झालेल्या राड्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. ज्यामध्ये एसपी कुल्लू गौरव सिंह यांनी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा प्रमुखाच्या कानशिलात लगावली. परंतु नेमक्या कोणत्या कारणामुळे हा राडा झाला हे समोर आलेले नाही.

खरंतर नितीन गडकरी बुधवारी मनाली दौऱ्यावर आले होते. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री जयराम ठाकुर भुंतर विमानतळावर पोहचले. रस्त्यातच काही शेतकऱ्यांची त्यांची भेट झाल्यानंतर मुख्यमंत्री जयराम ठाकूर सुद्धा त्या शेतकऱ्यांना भेटण्यास गेले. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांच्या गाडीच्या पाठी असलेल्या सुरक्षा रक्षक आणि एसपी कुल्लू यांच्यामध्ये मारहाणीला सुरुवात झाली.(Jammu-Kashmir: सोपोर मध्ये दहशतवाद्यांना भारतीय जवानांकडून सडेतोड उत्तर, लष्कराच्या कमांडरसह तीन जणांचा खात्मा) 

Tweet:

Tweet:

या घटनेनंतर अफवा सुद्धा फार पसरल्या गेल्या आहेत. मात्र यावर कोणीही बोलण्यास तयार नाही. घटना समोर आल्यानंतर लोक एसपीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करताना दिसून आले. व्हायरल व्हिडिओमध्ये स्थानिक लोकांकडून प्रदेशातील सरकारचा विरोध करताना दिसून आले. तर काहीजण एसपी कुल्लूच्या कार्यप्रणाली बद्दल आनंद व्यक्त कर त्यांच्या बाजूने घोषणाबाजी करत होते.