Jammu-Kashmir: सोपोर मध्ये दहशतवाद्यांना भारतीय जवानांकडून सडेतोड उत्तर, लष्कराच्या कमांडरसह तीन जणांचा खात्मा
Indian Army (Photo Credits-ANI)

Jammu-Kashmir: जम्मू-कश्मीर मध्ये रविवारी रात्री सुरु झालेल्या गोळीबारात भारतीय जवानांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तिन्ही दहशतवादी लष्कर ए तैयबाचे होते. जम्मू-कश्मीर पोलिसांच्यामते एन्काउंटरमध्ये आधी एका दहशतवाद्याला ठार केले. त्यानंतर अन्य दोन जणांचा खात्मा करण्यात आला. अद्याप सर्च ऑपरेशन सुरु आहे. पोलिसांच्या मते, उत्तर कश्मीर मधील सोपोरच्या गुंड ब्रथ परिसरात रविवारी रात्री उशिरा गोळीबार सुरु झाला. सुरुक्षा बलाच्या जवानांनी या परिसराला घेरल्यानंतर दोन्ही बाजूने गोळीबार सुरु झाला.

आयजीपी कश्मीर विजय कुमार यांनी म्हटले की, लष्कराचा टॉप दहशतवादी मुदालसिर पंडित ज्याने तीन पोलीसांची हत्या, दोन नगरसेवक आणि दोन सामान्य नागरिकांच्या हत्येत सामिल होता त्याला ठार मारण्यात यश आले आहे. एकूण लष्कराच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. मुदासिर याच्या नावावर 10 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते.(Gujarat Accient: गुजरातमध्ये भीषण अपघात! भरघाव ट्रकची कारला जोरदार धडक, 10 जण जागीच ठार)

Tweet:

यापूर्वी गेल्या शनिवारी जम्मू-कश्मीर मधील पोलिसांनी बारामुला मध्ये एका नार्को टेरर मॉड्युलचा भांडाफोड केला होता. केंद्र शासित प्रदेशातील पोलिसांनी 12 लोकांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून हेरॉइनचे 11 पॅकेट, हत्यारे आणि काडतूसांसह पैसे सुद्धा जप्त केले होते. पोलिसांनी म्हटले की, या लोकांकडे 10 ग्रेनेड, चार पिस्तुल आणि मोठ्या संख्येने काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त या लोकांकडे हेरॉइनचे 11 पॅकेट, 21.5 लाख रोकड आणि एक लाख रुपयांचा चेक सुद्धा जप्त केला होता.