Himachal Pradesh Clousburst: हिमाचल प्रदेशातील मंडीतील राजबन गावात ढगफुटी झाल्याची माहिती मिळाली आहे. या ढगफुटीमुळे अचानक गावात पुर देखील आला. पुरांत काही कुटुंब वाहून गेले आहे. आता पर्यंत नऊ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. तर अद्याप 45 लोक बेपत्ता आहेत. (हेही वाचा- पुण्यात खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग सुरू, या भागातील वीजपुरवठाही केला खंडीत)
मिळालेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी गावात लष्कर, एनीआरएफ, एसडीआरएफ, आयटीबीपी, सीआयएसएफ, हिमाचल प्रदेश पोलीस आणि होमगार्डच्या टीममधील 410 बचावकर्ते ड्रोनच्या मदतीने बेपत्ता लोकांच्या शोधात आहेत. अधिकाऱ्यांनी माध्यमांना माहिती दिली की, निर्मंड, सेंज आणि मलाना येथे ढगफुटी झाली. ३१ जुलै रोजी मंडीच्या पदर आणि शिमला येथील रामपूर उपविभागात पूरामुळे हाहाकार उडाला.
हिमाचल प्रदेश के कुल्लू में बलादी गाँव में जहाँ बादल फटने के बाद बाढ़ जैसी स्थिति बनी हुई है, वहीँ लैंडस्लाइड के कारण बंदरोल गांव कुल्लू से कट गया है।#HimachalPradesh #Rains #Landslide #Cloudburst #Kullu#Olympia2024 pic.twitter.com/uC11UMPscc
— swati8saini (@swati8saini) August 3, 2024
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ढिगाऱ्याखाली दबलेल्या किंवा अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी विविध उपकरणे आणि सेन्सरचा वापर केला जात आहे. रामपूर उपविभागातील समेजज गावातील 30 हून अधिक लोक बेपत्ता असल्याची नोंद आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते जय राम ठाकून यांनी शनिवारी कुल्लू जिल्ह्यातील सेंज भागाला भेट दिली आणि पीडिच कुटुंबांशी संवाद साधला. ढगफूटीमुळे तीन गावात जनजीवन विस्कळीत झाली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून निधी
हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्रि सुखविंदर सिंग सुखू यांनी समेज गावाला भेट दिली. तेथील परिस्थितीचे गांभीर्य लक्ष्यात घेत पीडितांसाठी 50,000 रुपयांची तात्काळ मदत जाहिर केली आणि सोबत त्यांना गॅस, अन्न आणि इतर जीवनाश्यक वस्तूंसह पुढील तीन महिन्यांसाठी भाड्यासाठी 5,000 रुपये मासिक दिले जातील अशी घोषणा केली.