'अग्गंबाई सूनबाई' मालिकेत 'हा' अभिनेता साकारणार 'बबड्या', 'माझ्या नव-याची बायको' मालिकेत केले होते काम
Agabai Sunbai Promo (Photo Credits: Facebook)

'अग्गंबाई सासूबाई' ही झी मराठीवरील (Zee Marathi) लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असली तरी त्या मालिकेचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नवा विषय, नवे नाव, सोबत काही नवे चेहरे या मालिकेत दिसणार आहे. 'अग्गंबाई सूनबाई' (Aggbai Sunbai) या नव्या मालिकेत अभिजीत राजे आणि आसावरी हे पात्र डॉ. गिरीश ओक आणि निवेदिता सराफच साकारणार आहे. मात्र सोहम आणि शुभ्रा हे आशुतोष पत्की आणि तेजश्री प्रधान न साकारता दुसरे कलाकार साकारणार आहे. त्यात नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये शुभ्राचे पात्र साकारणारी उमा पेंढारकर (Uma Pendharkar) समोर आली आहे. मात्र बबड्याची भूमिका कोण साकारणार हे अद्याप समोर आलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आशुतोष पत्कीऐवजी अद्वैत दादरकर (Adwait Dadarkar) बबड्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे उमा पेंढारकर आणि अद्वैत दादरकर ही जोडी प्रथमच एकत्र पाहायला मिळणार आहे.हेदेखील वाचा- Agabai Sunbai Promo: अग्गंबाई सासूबाई मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; 'अग्गंबाई सूनबाई' म्हणत सुरु होणार कथेचा नवा प्रवास (Watch Video)

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

अद्वैत दादरकर याने 'माझ्या नव-याची बायको' या मालिकेत सौमित्रची भूमिका साकारला होती. हे पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. त्यामुळे हाच सौमित्र बबड्याच्या भूमिकेत कसा दिसणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. प्रेक्षकांनीही अद्वैत बबड्याच्या भूमिकेत काय नवे वेगळेपण आणणार याची उत्सुकता लागली आहे.

दरम्यान या नव्या मालिकेची कथा काय असणार? दत्ताजी बंडोपत कुलकर्णी हे पात्र असणार की नसणार या सर्व गोष्टींची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.