Bigg Boss 13: बिग बॉस च्या घरात हिंसाचार; शहनाज गिल ने सिद्धार्थ शुक्ला ला कानशिलात लगावली व चप्पल फेकून मारले (Watch Video)
Siddharth Shukla, Shehnaaz Gill (Photo Credits: Instagram)

Bigg Boss 13: बिग बॉस 13 मधील स्पर्धक जसजसे दिवस सारत आहेत तसतसे हिंसक बनत असल्याचे दिसून येत आहे. आगामी भागामध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांच्यात जोरदार भांडण पाहायला मिळणार आहे. आज रात्रीच्या भागात (6 जानेवारी) आपल्याला पाहायला मिळणार आहे की शहनाझ गिल हिने सिद्धार्थला कानशिलात लगावली आहे.

आजच्या भागाच्या प्रिव्ह्यूमध्ये सिद्धार्थ हादरलेला दिसत असला तरी लगेचच मधुरिमा आणि विशालसोबत भांडायला जातो. मधुरिमा त्याला ‘छोटू’ म्हणते आणि चहा आणायला सांगतो. विशालने नकार दिला तर मधुरिमाने तिच्या चप्पलने त्याला मारले. दोघांनाही कन्फेशन रूममध्ये बोलावले जाते. विशाल मधुरिमा किंवा त्याला घराबाहेर पाठवण्याची मागणी बिग बॉसकडे करतो.

कन्फेशन रूममध्ये झालेल्या चर्चेनंतर बिग बॉस त्यांना शेवटची संधी देतात आणि ते शांततेत एकाच घरात राहणार की नाही ते विचारते.

सिद्धार्थ नंतर माहिराला सांगतो की ती घरातली एकमेव सोर्टेड मुलगी आहे. शेफाली जरीवाला, आर्ती सिंग, माहिरा आणि शहनाज यांच्या उपस्थितीत गार्डन एरियामध्ये हे घडते. शहनाज तिच्या खोलीत जाते आणि तिच्याशी बोलण्यासाठी सिद्धार्थ तिच्या मागे जातो. इकडे, शहनाजने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला आणि रागाच्या भरात तिने फोटो फ्रेम तोडली.

'Bigg Boss 13: हिमांशी खुरानाने Salman Khan वर केला आरोप; म्हणाली डिश धुण्याचे सलमानने केले होते नाटक, ज्यासाठी घेतले 630 कोटी रुपये

नंतर, सिद्धार्थ इतरांना सांगतो की एकदा जेलसीची भावना कोणाच्या मनात तयार झाली की दूर करता येत नाही. हे ऐकून शहनाजचा राग अजून वाढतो आणि अखेर ती त्याला “चप्पल’ फेकून मारते. ती मधुरिमा, असीम आणि आर्तीसमोर रडू लागते आणि म्हणते की सिद्धार्थने तिच्या नावाची बदनामी केली आहे आणि तिला कोणाचाही हेवा वाटत नाही.