Bigg Boss 13: हिमांशी खुरानाने Salman Khan वर केला आरोप; म्हणाली डिश धुण्याचे सलमानने केले होते नाटक, ज्यासाठी घेतले 630 कोटी रुपये
Salman Khan on Bigg Boss 13 (Photo Credits: Voot)

Himanshi Khurana Accuses Salman Khan: बिग बॉस 13 मधून हिमांशी खुराना ही नुकतीच बाहेर पडली आहे. हिमांशी एक वाईल्ड कार्ड स्पर्धक होती. परंतु, काहीच काळात तिला घरातून बाहेर पडावे लागले आहे. दरम्यान, हिमांशीने घरातून बाहेर पडल्यावर एक मोठा खुलासा केला आहे. ती म्हणाली की सलमानने बिग बॉसच्या घरात येऊन फक्त भांडी घासण्याचं नाटक केलं होतं. इतकाच नव्हे तर ती असंही म्हणाली की सलमानला हे करण्यासाठी 630 कोटी मिळाले होते.

काही काळापूर्वी बिग बॉस 13 होस्ट सलमान खान (Bigg Boss 13 host Salman Khan) हा एका एपिसोड दरम्यान बिग बॉसच्या घरी गेला होता. परंतु, तो स्पर्धकांना भेटायला करायला नाही तर घरातील सर्व घाणेरडी भांडी घासण्यासाठी आणि बाथरूम स्वच्छ करण्यासाठी गेला होता.

बिग बॉसच्या घरात सलमान खानचे भांडी घासणे म्हणजे फक्त नाटक असल्याचे हिमाशी खुराना हिने म्हटलं आहे. सलमान खानने डिशेस धुण्यासाठी 630 कोटी रुपये घेतल्याचेही तिने म्हटले आहे. यापूर्वी बिग बॉसमधील स्पर्धकांनी घराची साफसफाई न केल्याने सलमान खान बिग बॉसच्या घरात आला आणि भांडी स्वच्छ केले. त्याने बाथरूम देखील स्वच्छ केले.

Neha Pendse Marriage: 'शार्दूल राव आहेत बरे' म्हणत नेहा पेंडसे ने लग्नात घेतलेला उखाणा ऐकलात का?

खरंतर Biggbosskhabri13 नावाच्या एका इन्स्टाग्राम हँडलने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हिमांशी तिच्या सलूनमध्ये बसलेल्या मैत्रिणीशी बोलत आहे. या संभाषणादरम्यान हिमांशीने सलमानबद्दल या सर्व गोष्टी सांगितल्या. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याशिवाय बिग बॉस 13 मध्ये आपला खास मित्र असीम रियाज याला पाठिंबा दिल्याबद्दल हिमांशी खुराना चर्चेत आहे.