कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे लॉकडाऊनमध्ये असणाऱ्या लोकांचे मनोरंजन करण्यासाठी रामायण, शक्तिमान यांसारखे अनेक जुने शोज पुन्हा दाखवले जात आहेत. आता यामध्ये लहानग्यांचा आवडता शो ‘जंगल बुक’ची भर पडणार आहे. 90 च्या दशकातल्या मुलांचा सर्वात आवडता कार्यक्रम, 'द जंगल बुक' (The Jungle Book) पुन्हा एकदा टीव्हीवर येणार आहे. आज दूरदर्शन वाहिनीने ट्विटरवर याबाबतच्या घोषणेचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये शोच्या पुनःप्रसारणाबाबत माहिती दिली आहे. तर अशाप्रकारे उद्या 8 एप्रिल पासून दुपारी 1 वाजता द जंगल बुकचे प्रसारण दूरदर्शनवर होणार आहे.
#TheJungleBook on @DDNational - Watch your favourite show everyday at 1 pm, starting from tomorrow (April 8). #IndiaFightsCornona pic.twitter.com/uhhLKCILw7
— Doordarshan National (@DDNational) April 7, 2020
दूरदर्शन वाहिनीच्या या घोषणेमुळे प्रेक्षक बरेच खुश झालेले दिसत आहेत. ट्विटरवर याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रत्येकालाच आपल्या बालपणीचे दिवस आठवले असणार. यासह दूरदर्शनने आणखी एक घोषणा केली की, रमेश सिप्पी यांचा लोकप्रिय शो ‘बुनियाद’ सुद्धा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चॅनलच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे. डीडी नॅशनलवर सायंकाळी पाच वाजता या शोचे प्रसारण होईल. (हेही वाचा: 'रामायण' मालिकेत भरतची भूमिका साकारणारे संजय जोग यांचा मुलगाही आहे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार ज्याने निर्मिती सावंत सोबत केले होते काम)
शाम 5 बजे @DDNational पर वक्त है मशहूर निर्देशक रमेश सिप्पी द्वारा निर्देशित धारावाहिक 'बुनियाद' का।#Buniyaad pic.twitter.com/POsyl1D4Rv
— Doordarshan National (@DDNational) April 7, 2020
अशाप्रकारे दूरदर्शनने रामायण, ब्योमकेश बक्शी, हम हैं न, सर्कस, कृष्णकली, श्रीमान श्रीमती, देख भाई देख, बुनियाद, द जंगल बुक असे अनेक जुने शो परत आणले आहेत. दरम्यान सध्या जरी लोक लॉकडाऊन मध्ये असले, तरी कोरोना व्हायरसचा धोका अजूनही कमी झाला नाही. दररोज अशा रुग्णांची संख्या वाढतच आहे. आज मिळालेल्या माहितीनुसार, भारतात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूची 354 प्रकरणे समोर आली आहेत व अशाप्रकारे एकूण 4,421 प्रकरणांची पुष्टी झाली आहे.