Sri Krishna Show (Photo Credits: Twitter)

रामायण (Ramayan), उत्तर रामायण (Uttar Ramayan), महाभारत (Mahabharat) या प्रसिद्ध शोज नंतर आता श्रीकृष्ण (Sri Krishna) ही गाजलेली जुनी मालिका दूरदर्शन (DD) वाहिनीवर पुन्हा एकदा प्रक्षेपित केली जाणार आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी अधिकृत घोषणा करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) यांनी या मालिकेच्या प्रक्षेपणाची तारीख आणि वेळ सांगत ट्विट केले आहे. जावडेकर यांच्या माहितीनुसार, उद्या 3  मे पासून दररोज रात्री 9 वाजता श्रीकृष्ण मालिका दाखवली जाणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार देशभरात पुढील दोन आठवडे म्हणजेच 17 मे पर्यंत लॉक डाऊन (Lockdown) कायम ठेवण्यात येणार आहे यामुळे सर्व मालिका, चित्रपटांचे शूटिंग बंद आहे, परिणामी मालिकांचे नवे एपिसोड दाखवता येत नाहीयेत अशावेळी प्रेक्षकांना मनोरंजनाचा पर्याय म्ह्णून जुन्या मालिका पुन्हा दाखवल्या जात आहेत.  रामायण कार्यक्रम दूरदर्शन नंतर आता 'या' चॅनलवर प्रेक्षकांना पाहता येणार

रामायण, महाभारत या लोकप्रिय मालिकांसह शक्तीमान, श्रीमान श्रीमती, चाणाक्य या मालिकांनी मागील काही दिवसात रेकॉर्डब्रेकिंग टीआरपी कमावला आहे. सर्व चॅनल्सला मागे टाकत टीआरपीच्या स्पर्धेत दूरदर्शन चॅनल अव्वल ठरले होते, दूरदर्शच्या ट्वीटनुसार 16 एप्रिल रोजी रामायण ही 7.7 कोटी प्रेक्षकांसहित जगातील सर्वात अधिक पाहिली गेलेली मालिका ठरली होती. अशावेळी श्रीकृष्ण मालिकेचे पुनःप्रक्षेपण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

प्रकाश जावडेकर ट्विट

DD National ट्विट

दरम्यान, जुन्या मालिकांच्या प्रदर्शनाकरीता दूरदर्शनने 'डीडी रेट्रो' चॅनल सुरु केले आहे. रामायण, महाभारत आणि उत्तर रामायण या मालिका पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर यांनी लोकप्रियेतेचा उच्चांक गाठला. आता श्री कृष्णा मालिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.