Valmiki Jayanti 2024 HD Images

Valmiki Jayanti 2024 HD Images in Marathi: आज, 17 ऑक्टोबर 2024 रोजी पहिला संस्कृत श्लोक आणि महाकाव्य रामायणाचे लेखक महर्षि वाल्मिकी यांची जयंती (Valmiki Jayanti 2024) साजरी केली जात आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, त्यांचा जन्म अश्विन पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच शरद पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. त्यांची जयंती प्रगती दिन म्हणूनही साजरी केली जाते. प्रचलित समजुतीनुसार, महर्षि वाल्मिकी हे महर्षि कश्यप आणि माता अदिती यांचे नववे पुत्र वरुण आणि त्यांची पत्नी चर्षणी यांचे पुत्र होते. लहानपणी त्यांना एका भिल्लणीने चोरले होते आणि वाल्मिकी होण्यापूर्वी ते रत्नाकर नावाचा एक डाकू होते.

रत्नाकरला जेव्हा त्याच्या पापांची जाणीव झाली तेव्हा त्याने दरोडेखोराचा मार्ग सोडून नवा मार्ग स्वीकारण्याचे ठरविले. त्यावेळी नारदांनी त्याला मार्ग दाखवला व राम नावाचा जप करण्यास सांगितले. त्यानंतर पुढे ते महर्षि वाल्मिकी या नावाने प्रचलित झाले.

हिंदू महाकाव्य रामायणाचे लेखक आणि संस्कृतमधील सर्वात जाणकार महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त त्यांची पूजा-अर्चना करून मिरवणूक काढली जाते. या दिवशी रामायणाचे पठण आणि रामनामाचा जप करणे अत्यंत शुभ मानले जाते. महर्षी वाल्मिकींचे पवित्र स्थान असलेल्या लालापूर चित्रकूटमध्ये यंदा योगी सरकार मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. मंदिरांमध्ये श्री राम चरित मानस पठण, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, कीर्तन आदी कार्यक्रम होणार आहेत.

तर अशा या खास प्रसंगी Messages, Wishes, WhatsApp Status, Greetings शेअर करून द्या महर्षि वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा-

Valmiki Jayanti 2024 HD Images
Valmiki Jayanti 2024 HD Images
Valmiki Jayanti 2024 HD Images
Valmiki Jayanti 2024 HD Images
Valmiki Jayanti 2024 HD Images

(हेही वाचा: Valmiki Jayanti 2024 Messages: महर्षि वाल्मिकी जयंतीच्या दिवशी खास मराठी Wishes, WhatsApp Status, Greetings शेअर करून द्या शुभेच्छा)

दरम्यान, असे म्हणतात की वाल्मिकीजींच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन ब्रह्माजींनी त्यांना ज्ञानाचे वरदान दिले, त्यानंतर महर्षी वाल्मिकीं पहिला श्लोक आणि रामायण सारखे महाकाव्य रचले. महर्षी वाल्मिकींच्या मुखातून एका पारध्यासाठी निघालेला शाप हा संस्कृतचा पहिला श्लोक मानला जातो. महर्षि वाल्मिकींच्या मुखातून, मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः। यत्क्रौंचमिथुनादेकमवधी काममोहितम्।। हा पहिला श्लोक निघाला होता, ज्याचा अर्थ होतो- हे निषाद, प्रेमात मग्न असलेल्या पक्ष्याच्या जोडीला तू मारले आहेस, म्हणून तुलाही शाश्वत शांती मिळणार नाही. हा श्लोक संस्कृतचा पहिला श्लोक तर बनलाच पण तो रामायणाचाही पहिला श्लोक मानला जातो.