Rasika Sunil करतेय 'या' मुलाला करतेय डेट, रिलेशनशिपबाबत अभिनेत्रीने केला मोठा खुलासा
Rasika Sunil BF (Photo Credits: Instagram)

माझ्या नव-याची बायको फेम शनाया म्हणजेच सर्वांची लाडकी रसिका सुनील (Rasika Sunil) हिने आपल्या रिलेशनशिपबाबत मोठा खुलासा केला आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एका मुलासोबतचा फोटो शेअर करुन सर्वांना संभ्रमात पाडले होते. त्यामुळे हा मुलगा नक्की कोण याबाबत तिच्या चाहत्यांमध्ये चर्चा होऊ लागल्या होत्या. मात्र त्या सर्वावर आता रसिकाने पडदा उठवला असून टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत एक मोठा खुलासा केला आहे. "मी आदित्य बिलागी (Aditya Bilagi) याला डेट करत आहे" असे तिने TOI शी बोलताना सांगितले.

हा आदित्य तोच मुलगा ज्याच्यासोबतचा फोटो तिने नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोशल मिडियावर शेअर केला होता. आदित्य आणि तिची ओळख लॉस एंजेलिसमध्ये झाली होती.हेदेखील वाचा-Rasika Sunil Hot Photo: शनाया फेम रसिका सुनील चा स्विमिंग पुल मधील 'बोल्ड' लूक पाहून चाहते झाले घायाळ

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत रसिकाने, "होय, मी आदित्य बिलागीला डेट करतेय. आम्ही दोघंही सध्या लॉस एंजिलिसमध्ये आहोत आणि एकमेकांसोबत वेळ घालवत आहोत. मी खूप आनंदी आहे." असे सांगितले आहे.हेही वाचा- Rasika Sunil Hot Photos: अभिनेत्री रसिका सुनील हिचा वर्कआऊट करतानाचा 'हा' लूक पाहून भल्याभल्यांना फुटेल घाम, पाहा फोटोज

रसिकाने 1 जानेवारीला आदित्यसोबतचा फोटो शेअर करुन 'दो हजार एक किस.. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. २०२० या वर्षभरात अनेक वाईट घडामोडी घडल्या असल्या तरी कृतज्ञ राहण्यासाठी या वर्षाने अनेक कारणं दिली आहेत', असं कॅप्शन दिलं होतं. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

दोन वर्षांपूर्वी रसिका 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सोडून लॉस एंजिलिसला पुढील शिक्षणासाठी गेली होती. तेथेच तिची आदित्यशी ओळख झाली असून या दोघांमध्ये जवळीक वाढल्याचं दिसून येत आहे.