'माझ्या नव-याची बायको' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रसिका सुनील (Rasika Sunil) हिच्या बोल्ड अदांविषयी बोलावे तितके कमीच आहे. सोशल मिडियावर बरीच सक्रिय असणारी रसिका सुनील आपले एकाहून एक सरस हॉट (Hot) आणि सेक्सी (Sexy)फोटोज पोस्ट करुन चाहत्यांना घायाळ करत असते. नुकताच तिने स्विमिंग पूल मधील एक हॉट फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यातील तिच्या अदा बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकतील अशा आहेत.
या फोटोमध्ये रसिकाने बिकिन घातली असून ती स्विमिंग पूलमध्ये स्टायलिश अंदाजात उभी आहे. यात तिचा बोल्ड लूक एखाद्या जलपरीप्रमाणेच दिसत आहे. शनाया फेम रसिका सुनील चे ग्लॅमरस अंदाजातील फोटो पाहून शनू बेबीवर चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव, See Photos
View this post on Instagram
रसिकाच्या रिएन्ट्रीमुळे कंटाळवाणी झालेल्या मालिकेत पुन्हा एकदा रंगात आली आहे. गुरुनाथला धडा शिकविण्यासाठी राधिका आणि शनाया एकत्र मिळून मस्त डावपेच रंगवतायत.
दरम्यान मालिका सोडल्यावरही रसिका सुनील चांगलीच चर्चेत होती. जीम मधले फोटो पोस्ट करुन कधी फिटनेस गोल दाखवत तर कधी स्वीमिंग पूल मध्ये बिकिनी घालुन, बोल्ड फोटोशुटची झलक शेअर करुन रसिका ऑनलाईन बरीच अॅक्टिव्ह झाली होती.
अलीकडेच तिने एक जबरदस्त फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. यात तिचा ग्लॅमरस अंदाज पाहून तुम्हीही थक्क व्हाल. कधी स्विमसूट, कधी साडी, कधी ड्रेस मधील तिचे हटके लूक पाहून चाहते अक्षरश: फिदाच होतात. आपल्या सोशल अकाउंटच्या माध्यमातून ती नेहमी आपल्या चाहत्यांसोबत जोडलेली असते.