Kon Honaar Crorepati Launch Date: 'कोण होणार करोडपती' 27 मे पासून होणार सुरू
Kon Honaar Crorepati (Photo Credits: Facebook)

सचिन खेडेकर (Sachin Khedekar), स्वप्निल जोशी (Swwapnil Joshi) नंतर आता 'कोण होणार करोडपती' या मराठी 'कोण होणार करोडपती' रिअ‍ॅलिटी शोच्या सूत्रसंचालकाच्या हॉट सीटवर 'सैराट' फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) बसणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील त्याच्या तमाम चाहत्यांमध्ये या शो बद्दल उत्सुकता होती. अखेर येत्या 27 मे पासून 'कोण होणार करोडपती' हा रिअ‍ॅलिटी शो सोनी मराठी चॅनलवर सुरू होणार आहे. Kon Honaar Crorepati: 'कोण होणार करोडपती' या रिअ‍ॅलिटी शो साठी नागराज मंजुळे याने गायले रॅप सॉन्ग (Video)

कोण होणार करोडपती

सोनी मराठी चॅनलवर कोण होणार करोडपती हा बहुप्रतिक्षित रिअ‍ॅलिटी शो सोमवार ते गुरूवार रात्री 8.30 वाजता पहायला मिळणार आहे. हिंदीमध्ये 'कौन बनेगा करोडपती'ने अनेक विक्रम रचले. हिंदीमध्ये या शोचं सूत्रसंचालन बिग बी अमिताभ बच्चन करतात. लवकरच हिंदीमधील कौन बनेगा करोडपती देखील सुरू होणार आहे. Bigg Boss Marathi 2 Start Date 2019: 26 मे पासून रंगणार बिग बॉस मराठी 2; महेश मांजरेकर यांच्या रॅपर अंदाजात टायटल ट्रॅक रीलीज (Watch Video)

कोण होणार करोडपती सेटची झलक 

बिग बी अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे यांनी नुकतेच 'झुंड' या सिनेमाचं शुटींग संपवले आहे. नागराजच्या हिंदी चित्रपटाच्या दिग्दर्शनाचा हा पहिलाच प्रयत्न आहे.