Bigg Boss Marathi 2 Title Track: बिग बॉस मराठी 2 चा टीझर आल्यापासून हा सीझन कधी पासून सुरू होतोय? यंदाच्या सीझनमध्ये कोणकोणते कलाकार स्पर्धक म्हणून एंट्री घेणार? असे अनेक प्रश्न रसिकांना पडले होते. अखेर आज बिग बॉस सीझन 2 येत्या 26 मे पासून रसिकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. रॅपरच्या अंदाजात असलेल्या महेश मांजरेकरांवर (Mahesh Manjrekar) या सीझनचा टायटल ट्रॅक बनवण्यात आला आहे. हितेश मोडकने (Hitesh Modak) बिग बॉस मराठी 2 चं शीर्षकगीत बनवलं आहे. खरे की खोटे, जिथे सारे मुखवटे... अशांची गोष्ट घेऊन येतोय… असं ट्विट करत आज बिग बॉस मराठी 2 ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. Bigg Boss Marathi Season 2: प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच मराठी बिग बॉस सिझन 2; पाहा टीझर
बिग बॉस मराठी 2 टायटल ट्रॅक
खरे की खोटे, जिथे सारे मुखवटे...
अशांची गोष्ट घेऊन येतोय #BiggBossMarathi2 26 मे संध्या. 7 वा आणि रोज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर आणि @justvoot वर कधीही.
Bigg Boss title track (credits)
Music Composed, Arranged and Produced by Hitesh Modak pic.twitter.com/W74jAw18jx
— Bigg Boss Marathi official (@BIGGBOSSMARTHI) May 13, 2019
बिग बॉस मराठी 2 चे सूत्रसंचालक यांनी मागील काही दिवसात तीन प्रोमोजच्या माध्यमातून यंदा बिग बॉसच्या घरत राजकारणी, लावणी कलाकार आणि प्रवचनकार यांची एंट्री होऊ शकते असे संकेत दिले आहेत. त्यावरून सध्या सोशल मीडियात आणि चाहत्यांमध्ये नावांची चर्चा सुरू झाली आहे. बिग बॉस मराठी 2 चा ग्रॅन्ड ओपनिंग शो 26 मे रविवारी संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. आणि त्यानंतर रोज रात्री 9.30 वाजता बिग बॉस मराठी 2 कलर्स मराठीवर पाहता यईल. ऑनलाईन हा शो वूट अॅपवर पाहता येणार आहे.
बिग बॉस मराठी 1 ची विजेती मेघा धाडे ठरली होती. आता बिग बॉस 2 च्या घरात कोणाकोणाचा प्रवेश होतो आणि यंदा कोण बाजी मारतंय याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.