Khatron Ke Khiladi 13 Contestants List: 'खतरों के खिलाडी 13' स्पर्धकांची यादी लीक; वाचा संपूर्ण स्पर्धकांची लिस्ट
Khatron Ke Khiladi 13 (PC - Twitter)

Khatron Ke Khiladi 13 Contestants List: टीव्हीचा सर्वात लोकप्रिय साहसी रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi) सीझन 13 धमाकेदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. चाहत्यांमध्ये या शोची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. रोहित शेट्टीने आधीचं म्हटलं होत की, यावेळी धोकादायक स्टंटचा डोस जास्त असेल. नुकतीच या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची यादी लीक झाली असून, त्याबाबतची चर्चा जोर धरू लागली आहे.

खतरों के खिलाडी 13 मध्ये दिसलेल्या स्पर्धकांची संपूर्ण यादी सोशल मीडियावर लीक झाली आहे. बिग बॉस 16 च्या सदस्यांपासून ते टीव्हीवरील प्रसिद्ध व्यक्तींचाही या यादीत समावेश आहे. या यादीत काही धक्कादायक नावे देखील समाविष्ट आहेत, जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. (हेही वाचा - Kiccha Sudeep: कन्नड अभिनेता किच्चा सुदीप कर्नाटक निवडणुकीत भाजपचा करणार प्रचार, निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर दिले हे उत्तर)

लीक झालेल्या स्पर्धकांच्या नावांची यादी -

सौंदर्या शर्मा, अर्चना गौतम, प्रियांका चहर चौधरी, शिव ठाकरे, असीम रियाझ, दिशा परमार, मुनावर फारुकी, सनाया इराणी, प्रिन्स नरुला, अंजली अरोरा, नकुल मेहता. (हेही वाचा  - Pushpa 2 Teaser: ‘पुष्पा 2’ मधील अल्लू अर्जुनची पहिली झलक समोर)

दरम्यान, तेराव्या सीझनचे शूटिंग अर्जेंटिनामध्ये होणार आहे. जिथे सीझन 9 आणि सीझन 7 शूट करण्यात आले होते. मे महिन्यातच चित्रीकरणासाठी स्पर्धक अर्जेंटिनाला रवाना होतील. 17 जुलैपासून त्याचे टीव्हीवर प्रसारण होणार आहे. तसेच तुम्ही ते OTT वर देखील पाहू शकाल. यावेळी स्टंटबाजीतील धोक्यांचा डोस जास्त असेल, अशी अपेक्षा आहे.