अभिनेत्री गार्गी फुले-थत्ते photo Credit: Facebook

झी मराठीवरील 'तुला पाहते रे' मालिका अल्पावधीतच रसिकांच्या पसंतीस उतरली आली. अनेक दिवसांनी मराठी टेलिव्हिजनवर आलेला सुबोध भावे आणि युवा कलाकार गायत्री दातार यांच्या जोडीला चाहत्यांचं प्रेम मिळत आहे. सुबोध आणि गायत्री यांच्या भूमिकांभोवती या मालिकेची कहाणी फिरत असली तरीही सौ. निमकर म्हणजेच ईशाच्या आईची भूमिका साकारणारी गार्गी फुले - थत्तेही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.

गार्गी थत्ते म्हणजेच ईशाची आई मालिकेमध्ये चाळीत राहणार्‍या, एका मध्यमवर्गीय गृहिणीची भूमिका साकारत आहे. आपल्या नशिबी आलेले दारिद्र आणि तडजोड मुलीच्या आयुष्यात येऊ नये म्हणून तिच्यासाठी श्रीमंत शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अन 'या' प्रसंगानंतर सुबोध भावेचा स्वप्नांवरचा विश्वास वाढला

'तुला पाहते रे' मालिकेतून घराघरात पोहचेल्या 'या' ईशाच्या आईबद्दल तुम्हांला काही गोष्टी ठाऊक आहेत का ?

निळू फुलेंची मुलगी

गार्गी फुले - थत्ते या ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांची कन्या आहे. त्यांचा जन्म 18 सप्टेंबर 1976 सालचा आहे. गार्गीचं शिक्षण पुण्यातील अभिनव कॉलेज आणि एमए मुंबई विद्यापीठातील आहे.

झीमुळे घराघरात पोहचल्या

गार्गींनी 'तुला पाहते रे' पूर्वी झी युवावरील कट्टी बट्टी ही मालिका केली आहे. गार्गी साकारत असलेली सौ. निमकरांची भूमिका अल्पावधीतच रसिकांच्या आवडीची झाली आहे. गार्गी ईशाच्या आईची भूमिका साकारत आहे.

 

गार्गी फुले झाल्या थत्ते

गार्गी फुले या मूळच्या पुण्याच्या आहेत. त्यांनी ओंकार थत्तेंसोबत विवाह केला असून त्यांना एक मुलगा आहे. ओंकार थत्ते हे कलाविश्वात नसून पुण्यात ते शिक्षक आहेत.