Hemangi Kavi (Photo Credits: Instagram)

अभिनेत्री, डान्सर, कॉमेडियन अशा रूपात आजवर पाहायला मिळालेली मराठमोळी हेमांगी कवी (Hemangi Kavi)  आता हिंदी मालिकांमध्ये तब्बल अकरा वर्षांनी पुन्हा एंट्री घेत असल्याचे समजतेय. विशेष म्हणजेच या मालिकेचे निर्माते हे स्वतः महेश भट (Mahesh Bhatt)  असणार आहेत. या मालिकेचे नाव 'दिल जैसे धडके, धडकने दो' (Dil Jaise Dhadke Dhadkne Do) असे असणार आहे. स्टार प्लस वाहिनीवर दर दिवशी संध्याकाळी 7 वाजता प्रेक्षकांना ही मालीका पाहायला मिळणार आहे, तसं मालिकेत काम करण्याची ही काही हेमांगीची पहिली वेळ नाही यापूर्वी शुद्ध वतीने वेगवेगळ्या गाजलेल्या भूमिकेत आपले पात्र अगदी कमालीने साकारले होते. मात्र यावेळेस पहिल्यांदाच ती आईच्या भूमिकेत दिसणार असून तिचे नाव शांती असे असणार आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर चा 'खतरों के खिलाडी 10' मधील हा स्टंट पाहून तिच्या आईला अश्रू झाले अनावर, Watch Video

हेमांगीने स्वतः आपल्या इंस्टाग्राम वर आपल्या या नव्या सीरियल मधील भूमिकेची एक झलक शेअर केली आहे, यामध्ये ती एक अंगाई गाताना दिसून येतेय,हेमांगीचा हा लूक अगदी साधा असूनही लक्षवेधी आहे, एक मध्यमवर्गीय आई आणि तिच्या मुलीचं गोड नातं यामध्ये सध्या दिसून येतंय, मात्र मालिकेत एका स्त्रीचा एकूणच संघर्ष पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.

पहा हेमांगी कवी च्या मालिकेची झलक

दरम्यान, यापूर्वी मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हिंदी भाषेत मालिका गाजवल्या आहेत. सायली संजीवमी नेहा पेंडसे ही त्यातीलच काही नावं. दुसरीकडे सिनेमांच्या बाबतीतही मराठी कलाकार हिंदी मध्ये नाव कमावताना दिसून येत आहेत, तेजश्री प्रधान हि आगामी सिनेमा बबलू बॅचलर आणि मलंग मध्ये अमृता खानविलकर हि त्याची काही ताजी उदाहरणे म्हणता येतील अशाच प्रकारे हेमांगी सुद्धा हिंदी मध्ये यश मिळवेल अशी आशा तिच्या फॅन्स कडून व्यक्त केली जात आहे.