Amruta Khanvilkar (Photo Credits: Instagram)

श्वास रोखून धरणारे जबरदस्त स्टंट्स असलेला भारताचा लोकप्रिय रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी' (Khatron ke Khiladi) चा 10 वे पर्व सुरु झाले आहे. या पर्वात अनेक दिग्गज कलाकार या सहभागी झाली आहेत. या पर्वाचे निवेदन दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) करत आहेत. यात आपली मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. या कार्यक्रमात ती स्तब्ध करणारे जीवघेणे स्टंट्स करताना दिसत आहे. नुकताच तिने हेलिकॉप्टरमधून उडी मारण्याचा स्ंट केला होता. हा स्ंटट पाहून तिच्या आईला तिचा जितका अभिमान वाटतहोता तितकीच भीती तिच्या मनात होती. ही भीती त्यांच्या डोळ्यांतील अश्रूंनी सांगून दिली.

आपल्या मुलीचा हा स्ंटट अमृताची आई टीव्हीवर पाहत होती. यावर मुलीचे कौतुक तर केलेच मात्र आईची काळजी डोळ्यांतून काही लपली नाही.

पाहा व्हिडिओ:

आपल्या लेकीला स्टंट करताना पाहून आईच्या चेहऱ्यावर असलेलं प्रेशर या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. पण जेव्हा शेवटी अमृता उंचावरून पाण्यात उडी घेते त्यावेळी तिची आई अक्षरशः स्वतःचं डोकं पकडते. पण यासोबतच लेकीनं स्टंट पूर्ण केल्याचा आनंद सुद्धा चेहऱ्यावर झळकतो.

हेदेखील वाचा- Khatron Ke Khiladi 10: 'खतरों के खिलाडी 10' आजपासून सुरु; छोट्या पडद्यावरील सर्वात साहसी शोमध्ये अमृता खानविलकरसह सहभागी होणार 'हे' 10 सेलेब्ज

अमृताने या व्हिडिओखाली ‘मी कधी विचारही केला नव्हता की मी माझ्या आयुष्यात असं काही करेन. माझ्या आईच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून मला जाणवलं की तिला माझा नक्कीच अभिमान वाटत आहे. धर्मेश माझ्या भावा जर तू नसतास तर माझं काय झालं असतं. खूप प्रेम.’असे लिहिले आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'खतरों के खिलाडी'मधील आपल्या प्रवासाबद्दल बोलताना अमृता म्हणाली, जर एखाद्या कलाकाराला या शोची ऑफर मिळत असेल तर त्यानं ही ऑफर नक्की स्वीकारायला हवी'. हा शो तुम्हाला लाइफ टाइम अनुभव देतो असही ती पुढे म्हणाली.