Exclusive: तुझ्यात जीव रंगला चे 1000 भाग पूर्ण; पाहा काय म्हणाल्या पाठकबाई म्हणजेच अभिनेत्री अक्षय देवधर
Tuzhyat Jeev Rangala (Photo: File Image)

झी मराठी वाहिनीवरील एका रांगड्या बाजाची मालिका म्हणजे 'तुझ्यात जीव रंगला'. 2017 साली सुरु झालेली ही मालिका आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात. विशेष म्हणजे या मालिकेने नुकतेच 1000 भाग पूर्ण केले असून मालिकेतील सर्वच कलाकार भलत्याच खुशीत आहेत.

25 नोव्हेंबर रोजी मालिकेने 1000 भाग पूर्ण केले. परंतु कलाकारांनी एखाद्या पार्टीने हा क्षण साजरा न करता खूपच सध्या आणि निराळ्या पद्धतीचे सेलिब्रेशन केले आहे. कोल्हापुरात असणाऱ्या मालिकेच्या सेटवर एका पूजेचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेत्री अक्षया देवधर हिने LatestLY मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिचा मालिकेतील आजवरचा अनुभव शेअर केला आहे.

सेलिब्रेशन विषयी सांगताना, अक्षया म्हणाली, "आम्ही एका पूजेचे आयोजन केले होते. होमदेखील होता. आणि गावातील सर्व लोकांना जेवणाचे आमंत्रण देण्यात आले होते." तिचा आजवरचा अनुभव शेअर करताना ती म्हणाली, "माझ्यासाठी ही मालिका म्हणजे नक्कीच एक वेगळा अनुभव होता. कारण या मालिकेने मी रातोरात सेलिब्रिटी बनले. कारण या आधी मी या क्षेत्रात कधीच काम केलं नव्हतं, त्यामुळे लोकही मला ओळखत नव्हते."

Bigg Boss Marathi 2 विजेता शिव ठाकरे आणि वीणा जगताप नवस पूर्ण करण्यासाठी अनवाणी पोहचले वैष्णोदेवीच्या दर्शनाला: Exclusive

मालिकेच्या कथानकाविषयी सांगताना, अक्षया म्हणते, "कोणतीही सिरीयल काही काळानंतर बघणं प्रेक्षक बंद करतात. परंतु तुझ्यात जीव रंगला मालिकेसोबाबत असं अजिबात घडलं नाही. कारण यातील कथानक इतकं बदलत गेलं की प्रेक्षकांना प्रत्येकवेळी एक नवी गोष्ट पाहायला मिळत होती."