Heena Panchal (Photo Credits: Instagram)

Heena Panchal Bikini Look: बिग बॉस मराठी 2 च्या घरात हीना पांचाळने आपल्या हॉट लूक्स आणि सेन्सेशनल डान्सने सर्वांचेच मन जिंकले. तिची अदाकारी जितकी हटके ठरली तेवढाच तिच्या स्वभावातील सच्चेपणा. बिग बॉस मराठी संपून आता काही महिने उलटून गेले असले तरी आजही हीना तिच्या फॅन्ससोबत टचमध्ये असते ते तिच्या इंस्टाग्राम आणि टिक टॉक हँडलद्वारे.

अलीकडेच हीनाने एका पंजाबी म्युझिक व्हिडिओची ऑफर स्वीकारली असल्याने तिचा या व्हिडिओतील हॉट अंदाज सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

हीनाने तिच्या गाण्याचा एक ट्रेलर इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात तिने एक स्ट्रॅपलेस ब्लॅक बिकिनी परिधान केलेली दिसत आहे. तिचा हा ब्लॅक बिकिनी लुक पाहून तिच्या फॅन्सची कमेंट्स चा जणू वर्षावाचा केला आहे. हा खास अंदाजात व्हिडिओ तिच्या पंजाबी म्युझिक व्हिडिओ ‘बोर हो गाय’ च्या प्रमोशनच्या कव्हरसाठी शूट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये, हीना एका पूलच्या बाजूला बोल्ड अवतारात दिसत आहे.

'श्वेता तिवारी'च्या वेब सीरीजचे बोल्ड गाणे प्रदर्शित; पहा Hot Kissing सीन्स असलेला हा Video

दरम्यान, बिग बॉस मराठी 2 मध्ये हीना पांचाळने वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एंट्री केली होती. तिच्या येण्याने बिग बॉसच्या घरातील ग्लॅम फॅक्टर अधिक वाढला असं म्हणायला हरकत नाही. मात्र हीनाला ग्रँड फिनाले पर्यंत पोहोचण्या आधीच शोमधून एक्सिट घ्यावी लागली होती.