‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेमुळे रातोरात सुपरस्टार बनलेल्या श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ची जादू अजूनही छोट्या पडद्यावर कायम आहे. नच बलिये आणि बिग बॉस यांसारख्या कार्यक्रमातून श्वेता तिवारीचा एव वेगळा अंदाज आपल्याला दिसला. आता श्वेता तिची येऊ घातलेली वेब सिरीज 'हम तुम अँड देम’ (Hum Tum and Them) मुळे पुन्हा चर्चेत आली आहे. या सीरिजचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाला होता, आता यामधील एक गाणे प्रदर्शित झाले आहे. या वेब सीरिजमध्ये श्वेता अगदी बोल्ड स्टाईलमध्ये दिसली असल्याने तिच्या चाहत्यांना ही फार मोठी ट्रीट असणार आहे.
या सीरिजमध्ये श्वेतासह अक्षय ओबेरॉय (Akshay Oberoi) हा मुख्य भूमिकेत आहे. हा शो रोमँटिक रिलेशनशिप आणि कौटुंबिक घटनांवर आधारित आहे. घटस्फोट झाल्यानंतर आपले नवीन आयुष्य सुरु केल्यावर, सिंगर मदर असलेली श्वेता अक्षयच्या प्रेमात पडते. मात्र दोघांनाही आधीच मुले असल्याने या दोघांच्या नात्यात अडचणी निर्माण होतात. शेवटी श्वेता आणि अक्षय एकत्र येतील का हे पाहण्यासाठी आपल्याला ही सीरिज पहावी लागेल. सध्यातरी यातील गाणे सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे. (हेही वाचा: Pornhub ची प्रसिद्ध माजी XXX स्टार 'मिया खलिफा'ने शेअर केला मादक फोटो; तंग ड्रेसमधून दाखवला आपल्या वक्षांचा आकार (Photo))
‘कुछ इस तरह’ (Kuch Is Tarah) असे या गाण्याचे बोल असून, यामध्ये श्वेताने अनेक हॉट, बोल्ड आणि किसिंग सिन्स दिले आहेत. श्वेता पहिल्यांदाच तिच्या एका शोमध्ये को-स्टारसोबत असे बोल्ड सीन करताना दिसली आहे. श्वेताचे लिपलॉक सीनही इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. याव्यतिरिक्त श्वेता टीव्ही मालिका 'मेरे डॅड की दुल्हन' मध्ये दिसत आहे. या मालिकेत तिच्यासह वरुण बडोला मुख्य भूमिकेत आहे.