हिंदी वाहिनी कलर्सवरील लोकप्रिय शो 'बिग बॉस' चा 14 (Bigg Boss 14) वा सीजन नुकताच सुरु झाला. या कार्यक्रमाचा निवेदक सलमान खानच्या Salman Khan) याच्या दमदार अंदाजात या शो चा ग्रँड प्रिमियर झाला. कोरोना व्हायरसची खबरदारी बाळगत अनेक नवनवीन बदल या शो मध्ये करण्यात आले. तसेच बिग बॉसच्या आधीच्या सीजनमधील माजी स्पर्धकांना देखील या शो मध्ये आणण्यात आले. मात्र या सर्वांचा परिणाम मात्र TRP वर फारसा झाला नाही असे चित्र दिसत आहे. याला कारण म्हणजे IPL 2020. गेल्या वर्षीच्या तुलनेत आयपीएलने चांगली TRP मिळवली आहे.
यावर्षी कोरोना व्हायरस मुळे दिवसाला एकच मॅच खेळली जात आहे. रिपोर्टनुसार, 2019 च्या तुलनेत प्रति मॅच 11 मिलियन (1.1 कोटी) प्रेक्षकांसह आयपीएलला सुरुवातीच्या आठवड्यात 269 मिलियन (26.9 कोटी) प्रेक्षकांनी पाहिले. आयपीएलची सुरुवात कोरोना व्हायरस मुळे याची तारीख बदलत 19 सप्टेंबरपासून हे सामने सुरु झाले. तर बिग बॉस 14 वा सीजन 3 ऑक्टोबर पासून सुरु झाला. यात अनेक नवनवे बदल करण्यात आले. यामुळे पहिल्या आठवड्यात हा कार्यक्रम टॉप 5 च्या यादीत राहिला. तसेच व्हयूइंग मिनिटमध्ये देखील याचा रेकॉर्ड चांगला राहिला. हे व्हयूइंग मिनिट 2012 आणि 2013 च्या तुलनेत अधिक आहे. हेदेखील वाचा- CSK Vs RR, IPL 2020: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 7 विकेट्सने विजय
मात्र तरीही IPL ला बिग बॉसपेक्षा चांगली TRP मिळत आहे. इंडस्ट्री एनालिस्ट गिरीश जौहर ने IANS ने सांगितले ही, 'मला विश्वास आहे की, IPL सध्या चर्चेत आहे. कारण लोक केवळ चॅनलवर नाही तर स्ट्रीमिंगच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने देखील मॅच पाहत आहेत. आयपीएल बघणा-यांची संख्या खूप चांगली आहे. मॅचमध्ये सुपर ओवर जास्त आहेत. ज्यात सर्वांना उत्सुकता आहे.'
तसेच ट्रेड एनालिस्ट राजेश थडानी यांनी सांगितले आहे की, आयपीएल चांगला स्कोर करत आहे. बिग बॉस 14 तेवढा चांगला चालत नाही आहे. यावर्षीचे IPL सामने खूपच रंगतदार आहेत. सुपर ओवर सह अनेक गोष्टी होत आहेत.
यासोबत जाहिरातींमध्येही 15% वाढ झाल्याची पाहायला मिळाले आहे. बिग बॉस 13 ची सुरुवात ही आयपीएलनंतर झाली होती. त्यामुळे आयपीएल संपल्यानंतर बिग बॉस 14 TRP मध्ये पुन्हा वर येईल असे सांगण्यात येत आहे.