Bigg Boss 14: लक्झरी सुविधांपासून ते क्रूसाठी साप्ताहिक कोरोना व्हायरस चाचणी पर्यंत, जाणून घ्या Salman Khan चा शो बिग बॉस 14 मध्ये काय असू शकते खास
Bigg Boss 14 (Photo Credits: Twitter)

हिंदी टेलीव्हिजन वरील एक लोकप्रिय व तितकाच वादग्रस्त शो, बिग बॉस (Bigg Boss) त्याचे 14 वे पर्व (Bigg Boss 14) घेऊन लवकरच भेटीला येत आहे. 3 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9 वाजता कलर्स वाहिनीवर या शोला सुरुवात होणार आहे. बिग बॉस 13 ला मिळालेली लोकप्रियता पाहता यंदा बिग बॉस 14 कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आज या कार्यक्रमाचे व्हर्च्युअल लाँचिंग चालू असताना, बिग बॉसच्या या सिझनमधील काही गोष्टी समोर आल्या आहेत. सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या बिग बॉसमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. यावर्षीचा बिग बॉस कशा प्रकारे वर्ष 2020 ला उत्तर देईल ते याधीच्या अनेक प्रोमोमधून समोर आले आहे.

प्रेक्षकांच्या समोर मनोरंजनाचे विश्व उभे करताना, स्पर्धकांच्या सुरक्षेचीही  काळजी घेतली जात आहे. तर चला पाहूया यंदाच्या बिग बॉस 14 मध्ये काय खास असणार आहे.

>> यावेळी, 2020 ला उत्तर देताना, बिग बॉस घरामध्ये लॉकडाऊन दरम्यान न अनुभवलेल्या गोष्टी स्पर्धकांना मिळणार आहे. यामध्ये रेस्टॉरंट, स्पा, जिम, चित्रपटगृह यांसारख्या लक्झरी सुविधांचा आनंद लुटता येईल.

>> आमचा असा विश्वास आहे की, बिग बॉसच्या 'मागील हंगामांतील' सर्वोत्कृष्ट स्पर्धक यंदा बीबी 14 गेममध्ये ‘पॉवर ट्रायो’ म्हणून सामील होणार आहेत. कलर्सचे कंटेंट हेड मनीषा शर्मादेखील यामध्ये असतील. आपण असे गृहीत धरू शकतो की, बीबी पॉवर ट्रायो या हंगामात संभाव्य मार्गदर्शकाच्या रूपाने घरात प्रवेश करतील. यामध्ये सिद्धार्थ शुक्ला, गौहर खान व हीना खानचा समावेश आहे.

>> आज सलमान खानने बिग बॉस 14 चा पहिला स्पर्धक कुमार सानूचा मुलगा ‘जान’चे नाव जाहीर केले आहे. जानची ओळख करून दिल्यानंतर सलमानने त्याला बिग बॉस 13 विजेता सिद्धार्थ शुक्लाकडून काही सल्ला घेण्याचा सल्ला दिला आहे.

>> यावेळी, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बिग बॉस 14 साठी अतिशय कडेकोट आणि कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे, मनीषा यांनी याबाबत माहिती दिली. यामध्ये स्पर्धकांची कोरोना व्हायरस टेस्ट करून त्यांना खेळ सुरु होण्यापूर्वी 15 दिवस आधी घरात वेगळे ठेवण्यात येणार आहे. तसेच सर्व कॅमेरा क्रूची साप्ताहिक अनिवार्य कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे. (हेही वाचा: 'बिग बॉस 14' च्या घरातील फोटो आले समोर; पहा असा आहे आतमधील नजारा)

दरम्यान, दरम्यान, सलमान खानने या शोचे 10 सीझन होस्ट केले आहेत व कदाचित ज्या पद्धतीने तो हा शो होस्ट करतो त्याची जागा इतर कोणी घेऊ शकणार नाही. सलमानचे होस्टिंग हे या शोच्या वाढत्या टीआरपीमध्ये महत्वाची भूमिका बजावते. आता सलमान खानला यंदा प्रत्येक एपिसोडसाठी तब्बल 20 कोटी मिळणार आहेत. सलमान खानची यंदाच्या सिझनची तीन महिन्यांची फी 480 कोटी आहे. परंतु एका स्रोताच्या मते, चॅनल आणि सलमानच्या टीमने 450 कोटींवर हा करार अंतिम केला.