Bigg Boss 14 Inside House Photos: 'बिग बॉस 14' च्या घरातील फोटो आले समोर; पहा असा आहे आतमधील नजारा
Bigg Boss 14 Inside House Photos (PC - Instagram)

Bigg Boss 14 Inside House Photos: बहुप्रतिक्षित टिव्ही शो बिग बॉस 14 चा सीझन लवकरच सुरू होणार आहे. निर्मात्यांनी हा शो खास करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. 3 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या शोसाठी निर्मात्याने कोणतीही कसर सोडलेली नाही. कोरोना संकटामुळे बिग बॉस 14 च्या घरात कोणती विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्वच प्रेक्षक उत्सुक आहेत. अशातचं आचा बिग बॉसच्या घरातील फोटो समोर आले आहेत. सध्यो सोशल मीडियावर बिग बॉसच्या घराचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, कोरोना संकटामुळे बिग बॉसच्या घरात विविध बदल करण्यात येणार आहेत. बिग बॉस 14 मध्ये पुन्हा एकदा सिंगल आणि डबल बेड्स दिसत आहेत. तसेच बेडरूमचा रंग वेगवेगळ्या रंगांनी सजवण्यात आला आहे. यात डायनिंग टेबल आणि स्वयंपाकघर अतिशय सुंदररित्या सजवण्यात आलेलं दिसून येत आहे. याशिवाय सलमान खान सोबत चर्चा करण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी विशेष सोफा लावण्यात आला आहे. यावेळी सोफा सिल्वर रंगाचा असणार आहे. (हेही वाचा - Bigg Boss 14: कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर यंदा बिग बॉस च्या घरात कोणताही Physical Task नाही; दर आठवड्याला होणार कोरोना टेस्ट)

दरम्यान, यावेळी बिग बॉसचा हंगाम बर्‍यापैकी भव्य होणार आहे. बिग बॉस शोमध्ये सलमान खानसह सिद्धार्थ शुक्ला, गौहर खान, शहनाज गिल स्पर्धकांचे स्वागत करणार आहेत. सध्या बिग बॉसच्या घराचे फोटो सोशल माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना बिग बॉस शोची उत्सुकता लागली आहे.