टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) आता या जगात नाही. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांना हादरवून सोडले आहे. त्याच्या मृत्यूनंतर अनेक चाहते त्याची सोशल मीडियावर आठवतशेअर करत आहेत. बिग बॉस 13 चे विजेतेपद पटकावण्यापूर्वी सिद्धार्थ शुक्लाने बालिका वधू या शोद्वारे एक छाप पाडली. या शोमधील त्याचे पात्र खूप आवडले गेले होते . या शोमध्ये सिद्धार्थ अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीसोबत (Pratyusha Banerjee) दिसला होता. दोघांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. पण आता या दोघांनी हे जग सोडले आहे. अर्थातच चाहत्यांसाठी दु: खद बातमीपेक्षा कमी नाही. तर, शोमध्ये दादी साची भूमिका करणाऱ्या सुरेखा सिक्री (Surekha Sikri) यांचेही नुकतेच निधन झाले आहे. (Sidharth Shukla Passes Away: सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाज गिल पुर्णपणे खचली, प्रकृतीबाबत वडिलांनी दिली प्रतिक्रिया )
1 एप्रिल 2016 रोजी प्रत्युषा बॅनर्जीच्या निधनाची बातमी समोर आल्यावर सर्वांनाच धक्का बसला होता . प्रत्युषाने आत्महत्या केली होती की तिची हत्या झाली होती हे अजूनही गूढच आहे. हे प्रकरण अजूनही तिचे कुटुंब लढत आहे. तर गेल्या महिन्यात 16 जुलै रोजी मालिकेमध्ये दादीसा ची भूमिका करणाऱ्या सुरेखा सिक्री यांचेही निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या आणि बऱ्याच दिवसांपासून आजारी होती.
अशा परिस्थितीत आता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांचेच हृदय तोडले आहे. साहजिकच, चाहत्यांसाठी आणि कुटुंबासाठी हा दुःखाचा डोंगर कोसळण्यासारखे आहे.