Balasahebancha Raj: ठाकरे काका-पुतण्यांवर आधारित मराठी रंगभूमीवर येणार नाटक; बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिवशी 'बाळासाहेबांचा राज'चा पहिला प्रयोग
बाळासाहेबांचा राज । PTI and Instagram

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यावर जीवनपट रूपेरी पडद्यावर पाहिल्यानंतर आता राज आणि बाळ ठाकरे यांच्यावर आधारित नवं मराठी नाटक रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज आहे. 23 जानेवारी 2023 ही बाळ ठाकरेंची जयंती आहे. त्याचं औचित्य साधत 'बाळासाहेबांचा राज' (Balasahebancha Raj) चा पहिला प्रयोग रंगणार आहे. या नाटकात राज ठाकरे (Raj Thackeray) आणि बाळ ठाकरे (Bal Thackeray) यांच्या भूमिकेत कोण कलाकार असणार ही नावं अद्यापही गुलदस्त्यामध्ये आहेत.

अनिकेत बंदरकर हे या नाटकाचे लेखक- दिग्दर्शक असून गणेश कदम यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. मागील दिवाळी पाडव्यावर या नाटकाच्या संहितेचं अनावरण राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. आता या नाटकामध्ये राज आणि बाळ ठाकरे यांच्या भावनिक नात्यातील पदर नाटकात उलगडले जाणार आहेत.

23 जानेवारी दिवशी प्रभादेवीच्या रविंद्र नाट्यमंदिरामध्ये शुभारंगाचा प्रयोग पार पडणार आहे.नक्की वाचा: Bal Thackeray Birth Anniversary: बाळ ठाकरे यांच्या जयंती निमित्त पहा त्यांचे खास फोटोज आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वातील काही गोष्टी (View Pics) .

पहा पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Amit Thackeray (@amitthackerayspeaks)

बाळासाहेबांचा राज हे दोन अंकी नाटक असणार आहे. इतर नाटकांप्रमाणे या नाटकाचे देखील प्रयोग होतील. काही दिवसांपूर्वी या नाटकाला सेन्सॉरचे प्रमाणपत्र देखील मिळाले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे आणि राज ठाकरे हे काका-पुतणे असले तरीही त्यांचं नातं बाप-लेकासारखं होतं. राज ठाकरेंना बाळासाहेबांचा मोठा सहवास मिळाला आहे. त्यांच्या जडणघडणीत बाळासाहेबांचेही संस्कार झाले आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्येही बाळासाहेबांची छाप दिसते. कालांतराने बाळ ठाकरे आणि राज ठाकरे वेगळे झाले. शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे.  त्यामुळे पहिल्यांदाच नाटकासारख्या  कलाकृतीच्या माध्यमातून त्यांच्यातील भावविश्व उलगडताना पाहणं मोठं उत्सुकतेचं असणार आहे.