
Balasaheb Thackeray Jayanti 2021: बाळ केशव ठाकरे (Bal Thackeray) ते शिवसेना प्रमुख हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे हा प्रवास महाराष्ट्रातील राजकारणामधील एक महत्त्वाचा टप्पा आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 दिवशी पुण्यात झाला. प्रबोधनकार ठाकरे आणि रमाबाई ठाकरे यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. बाळ ठाकरे हे दर्दी रसिक, व्यंगचित्रकार, राजकारणी, उत्तम वक्ते होते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून ते आजतागायत महाराष्ट्राचं राजकारण हे कायमच 'ठाकरे' घराण्याभोवती होते. बाळ ठाकरेंनी राजकारण आणि समाजकारणाचा वसा त्यांचे वडील प्रबोधकार म्हणजेच केशव सीताराम ठाकरे यांच्या कडून घेतले आहे. 'You Can Love him or hate him but you cannot ignore him' असं राजकीय व्यक्तिमत्त्व असणार्या बाळासाहेबंचा जीवनप्रवास काही फोटोंच्या माध्यमातून पाहुया! नक्की वाचा : Balasaheb Thackeray Birth Anniversary: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे पुन्हा एकदा एकाच व्यासपिठावर; शरद पवार, देवेंद्र फडणवीसही राहणार उपस्थित.
- बाळासाहेब ठाकारे यांचे शिक्षण अवघे सहावी पर्यंतच झाले. प्रबोधनकार ठाकरेंची फिरती नोकरी, त्यांचं आजारपण यामुळे पैसे नसल्याने बाळासाहेबांना त्यांचं शिक्षण पूर्ण करता आलं नाही. पण त्यांच्या हातामध्ये कला होती आणि वडीलांकडून त्यांनी वकृत्त्व गुण वारसा हक्काने घेतले होते.

- 19 जून 1966 ला शिवसेनेची मुहूर्तमेढ दादरच्या कदम मॅन्शन मध्ये झाली. हे ठाकरेंचं निवासस्थान होतं. 18 जणांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची स्थापना झाली होती.

- शिवसेनेचा पहिला मेळावा 30 ऑक्टोबर 1966 साली शिवाजी पार्क वर भरला होता.
- जून 1948 मध्ये 21 वर्षीय बाळ ठाकरेंचा विवाह 16 वर्षांच्या सरला वैद्य यांच्याशी झाला आणि नंतर त्यांचे नाव मीना ठाकरे झाले. पुढे त्या शिवसैनिकांच्या मॉं म्हणून परिचित झाल्या.

- बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय सप्टेंबर 1966 मध्ये मातोश्री निवासस्थानी रहायला गेले.

- बिंधूमाधव, जयदेव आणि उद्धव ठाकरे ही तीन बाळासाहेब ठाकरे यांची अपत्य होती. त्यापैकी बिंधूमाधव यांचा 1996 साली कार अपघातामध्ये मृत्यू झाला. त्याच्या सहा महिने आधीच मीनाताईंचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.
- शिवसेनेचे मुखपत्र सामना 1989 साली सुरू झाले बाळासाहेब ठाकरे त्याचे संपादक होते.

- 1950 मध्ये बाळासाहेब ठाकरे फ्री प्रेस जर्नल मध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम करायला लागले. त्यावेळी त्यांनी आर के लक्ष्मण यांच्यासोबत काम केले होते. इंदिरा गांधी त्यांच्या व्यंगचित्रात आवडती व्यक्तीरेखा होती असं सांगितलं जातं.

- 1960 साली त्यांनी मार्मिक हे साप्ताहिक सुरू केले. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झाले.
- भारत-पाक संबंध ताणल्यानंतर बाळासाहेबांचा पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याचा विरोध होता, तरीही त्यांनी जावेद मियादांद ला आपल्या घरी बोलावलं होत.

- राज ठाकरेंना बाळासाहेबांची सावली म्हणून संबोधलं जात असतं. राज ठाकरे आणि बाळासाहेब काका-पुतण्या असले तरीही त्यांनी पुत्रवत राज ठाकरेंवर प्रेम केले आहे. राज ठाकरेंवरही बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव दिसतो.

- अंतर्गत कलहामधून राज ठाकरेंनी शिवसेनेला रामराम करत मनसेची स्थापना केली.
View this post on Instagram
- 2010 साली शिवसेनेत तरूणांच्या नेतृत्त्वासाठी युवासेनेची स्थापना करून बाळासाहेबांनी नातू आदित्य ठाकरे याच्या हातात त्याची धुरा दिली.
मुंबईत मातोश्री या निवासस्थानी बाळ ठाकरे यांचे 17 नोव्हेंबर 2012 साली निधन झाले. दरम्यान त्यांच्या हृद्यावर काही शस्त्रक्रिया झाल्या होत्या. वयोमानानुसार थकलेल्या बाळासाहेबांनी हळूहळू सक्रीय राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.