तैमूर अली खानला टक्कर देण्यासाठी बाजारात आल्या हिंदी मालिका कसोटी मधील प्रेरणा आणि कोमोलिकाच्या बाहुल्या
प्रेरणा आणि कोमोलिका (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)

टेलिव्हिजवरील सध्या हिंदी मालिकांमधील कसोटी जिंदगी की 2 (Kasautii Zindagii Kay2) सर्वांच्या पसंदीस पडत आहे. त्यामुळे या मालिकेतील प्रेरणा (Prerana) आणि कोमोलिकाच्या (Komolika) चर्चा यापूर्वीपासूनच होत्या. परंतु या दोघींच्या चर्चांना आणखीनच उधाण आले असून चक्क त्यांच्या बाहुल्या बाजारात विक्रीस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

यापूर्वी तैमूर अली खान (Taimur Ali Khan) याचा बाहुला बाजारात विक्रीस आला. त्यानंतर कसोटीमधील प्रेरणा आणि कोमोलिका यांच्या बाहुल्या बाजारात ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. कमोलिका ही खलनायिकाची भुमिका साकारत असून प्रेरणा आणि अनुराग हे मुख्य भुमिका साकारताना दिसून येत आहेत. या दोघींच्या बाहुल्या बाजारात विक्रीस आल्याची बातमी एका कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन दिली आहे.

 

View this post on Instagram

 

Wat biggger compliment for these iconic characters ! Thanku ppl for d love !!! Komo dolls n prerna dolls !! Wats ur pick ????

A post shared by Erk❤️rek (@ektaravikapoor) on

(स्टार किड्सची मार्केट व्हॅल्यू इन कॅश; तैमुर बाहुला बाजारात दाखल)

तर या दोघींच्या बाहुल्या चाहत्यांना फार आवडत आहेत. तर एकता कपूर हिने प्रेक्षकांनी बाहुल्यांच्या प्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद मानले आहेत. या दोन्ही अभिनेत्रींचा मालिकेतील पेहराव प्रेक्षकांना आकर्षित करत आहे.