'माझ्या नव-याची बायको' मालिकेत पुनरागमन करणा-या रसिका सुनील ऊर्फ शनायाने 'हटके' मास्कच्या माध्यमातून स्टाईलने दिली आपल्या रिएन्ट्रीची बातमी; Watch Photo
Rasika Sunil (Photo Credits: Instagram)

झी मराठीवरील (Zee Marathi) लोकप्रिय मालिका 'माझ्या नव-याची बायको' (Majya Navryachi Bayko) या मालिकेत जुनी शनाया म्हणजेच रसिका सुनील (Rasika Sunil) परतणार असल्याची बातमी एव्हाना प्रत्येक घराघरात पोहोचली आहे. त्यामुळे या मालिकेचे आणि विशेष करुन रसिकाचे सर्व चाहते तिची आतुरतेने वाट पाहात आहेत. अशा फार ठराविक मालिका आहेत ज्यातील नकारात्मक पात्र करणा-या कलाकाराला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं आहे. त्यामुळे सध्या रसिकाही भलतीच खूश आहे. त्यामुळे तिनेही एक हटके स्टाईलचे मास्क घालून आपली या कार्यक्रमातील रिएन्ट्रीच्या बातम्यांना दुजोरा दिला आहे.

रसिकाने चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन शिकण्यासाठी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता, त्यावेळी जय मल्हार मालिकेतील बानुबया चा चेहरा म्हणजेच अभिनेत्री इशा केसकर (Isha Keskar) हिच्याकडे हा रोल गेला होता, मात्र आता इशा सुद्धा वैयक्तिक कारणामुळे मालिका सोडणार असल्याने हा रोल पुन्हा एकदा रसिकाकडेच जाणार असल्याचे समजत आहे.

हेदेखील वाचा- शनाया परतणार! माझ्या नवर्‍याची बायको सीरीयल मध्ये रसिका सुनील ची पुन्हा एंट्री

 

View this post on Instagram

 

Time to make things official! 13th july pasna ratri 8 vajta Zee marathi var ! #mnb

A post shared by Rasika Sunil (@rasika123s) on

रसिका सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. त्यामुळे तिने 'माझ्या नव-याची बायको' या मालिकेचे नाव असलेला मास्क घालून आपली या मालिकेतील रिएन्ट्री जाहीर केली आहे.

दरम्यान मालिका सोडल्यावरही रसिका सुनील चांगलीच चर्चेत होती. जीम मधले फोटो पोस्ट करुन कधी फिटनेस गोल दाखवत तर कधी स्वीमिंग पूल मध्ये बिकिनी घालुन, बोल्ड फोटोशुटची झलक शेअर करुन रसिका ऑनलाईन बरीच अ‍ॅक्टिव्ह झाली होती.