प्रियंका आणि निक जोनसने अमेरिकेत घेतले 144 कोटी रुपयांचे घर
Priyanka Chopra, Nick Jonas house (PC - Twitter)

बॉलिवूडमध्ये प्रियंका (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) ही जोडी कायम चर्चेत असते. प्रियंका सध्या निकसोबत सुखी संसारात व्यग्र आहे. सध्या या दोघांनी लॉस एंजलिसमधील (Los Angeles America) सॅन फनांडो व्हॅलीमध्ये 144 कोटी रुपयांचे घर घेतले आहे. प्रियांका आणि निक यांनी याअगोदर बेवर्ली हिल्स भागात घर घेतलं होतं. परंतु, सोशल मीडियावर हे घर विकल्याची चर्चा रंगली होती. परंतु, आता या कपलने पुन्हा सुंदर मॅन्शन खरेदी केलं आहे. या घराची किंमत 20 मिलियन डॉलर्स येवढी असून हे घर 20 हजार स्क्वेअर फुटाचं आहे. या घरात 7 बेडरूम असून मोठ्या आकाराचा स्विमिंग पूलही आहे. विशेष म्हणजे निक आणि प्रियंकाच्या या घरातून फनांडो व्हॅलीचं सुंदर दृश्य दिसतं. याव्यतिरिक्त या घरामध्ये बॉलिंग ऑले, थिएटर, बास्केटबॉल कोर्ट, लाउंज एरिया, जिम आदी सुविधाही आहेत. फनांडो व्हॅलीमध्ये निकच्या थोरल्या भावाचेही घर असून हे घरही खूप आकर्षक आहे. (हेही वाचा - बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने शेअर केले 'डिप नेक रेड गाऊन'मधील बोल्ड फोटो)

प्रियंका चोप्रा ट्विट - 

वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, प्रियांका आणि निकनं खरेदी केलेली हे घर 20 हजार स्क्वेअर फुटांचं आहे. या घरासाठी त्यांना 20 मिलियन डॉलर म्हणजेच 144 कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत. विशेष म्हणजे या घराला 11 बाथरूम आहेत. 'द स्काय इज पिंक' हा प्रियंकाचा चित्रपट 11 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. हा चित्रपट मोटिव्हेशनल स्पीकर आयशा चौधरी यांच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली.

हेही वाचा - लता मंगेशकर यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी राज ठाकरे यांची प्रार्थना; केलं 'हे' खास ट्वीट

यावर्षी प्रियंकाने अमेरिकन सिंगर निक जोनससोबत लग्नगाठ बांधली. तेव्हापासून प्रियंका भारतापेक्षा अमेरिकेत जास्त वेळ राहू लागली आहे. परंतु, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमी अॅक्टिव्ह असते. निक आणि प्रियंका नेहमी नव-नवीन फोटो शेअर करत असतात. अनेकदा नेटिझन्स तिला अनेक कारणांवरून ट्रोल करत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रियंका गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.