लता मंगेशकर यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी राज ठाकरे यांची प्रार्थना; केलं 'हे' खास ट्वीट
आज (14 नोव्हेंबर) मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लता मंगेशकर या आजारावर मात करून पुन्हा ठणठणीत बर्या होतील अशा प्रकारची प्रार्थना केली आहे.
भारताची गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) मागील काही दिवसांपासून मुंबईतील ब्रीज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. श्वसनादरम्यान त्रास होत असल्याची तक्रार लता मंगेशकरांनी केल्यानंतर त्यांना सोमवार ( 11 नोव्हेंबर) दरम्यान त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती मंगेशकर कुटुंबियांकडून काल देण्यात आली आहे. दरम्यान आज (14 नोव्हेंबर) मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लता मंगेशकर या आजारावर मात करून पुन्हा ठणठणीत बर्या होतील अशा प्रकारची प्रार्थना केली आहे.
लता मंगेशकरांच्या फुफ्फुसांमध्ये इंफेक्शन झाल्याने त्यांना श्वसनादरम्यान त्रास होत असल्याची माहिती देण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी मीडिया रिपोर्टसनुसार, लता मंगेशकर यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. यानंतर आता प्रकृतीत सुधारणा होत असून लवकरात लवकर डिस्चार्ज देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा; लवकरच मिळणार डिस्चार्ज.
राज ठाकरे यांचे ट्वीट
दीदी, तुमच्यातली इच्छाशक्ती आणि तमाम हिंदुस्थानीयांच्या प्रार्थनेचं बळ इतकं मोठं आहे की ह्या आजारातून तुम्ही लवकरच ठणठणीत बऱ्या होणार आहात. आम्ही सगळेच आमच्या दीदींसाठी मनापासून प्रार्थना करतोय. @mangeshkarlata #getwellsoon
— Raj Thackeray (@RajThackeray) November 14, 2019
दीदी, तुमच्यातली इच्छाशक्ती आणि तमाम हिंदुस्थानीयांच्या प्रार्थनेचं बळ इतकं मोठं आहे की ह्या आजारातून तुम्ही लवकरच ठणठणीत बऱ्या होणार आहात. आम्ही सगळेच आमच्या दीदींसाठी मनापासून प्रार्थना करतोय. असे ट्वीट राज ठाकरे यांनी केलं आहे.
ब्रीच कँडी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर फारुख उदवाडिया यांच्या देखरेखीखाली लता मंगेशकर यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशी माहिती देण्यात आली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Nov 14, 2019 05:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

