बालिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही बॉलिवूडमधील सर्वाधिक हॉटेस्ट अभिनेत्र्यांपैकी एक आहे. मलायका केवळ आपल्या स्टाइलनेच नव्हे तर फिटनेसनेही सर्वांना प्रत्सोहित करत असते. मलायका आपल्या इंस्टाग्रामवर जिम आणि फिटनेसचे अनेक व्हिडिओज पोस्ट करत असते. मलायकाने नुकतीच 'ग्लोबल स्पा अवार्ड'मध्ये हजेरी लावली.
यावेळी मलायकाचा रेड कार्पेटवरीव लूक सर्वांना घायाळ करणारा होता. या फोटोजमध्ये मलायका खूपच हॉट आणि फिट दिसत आहे. यावेळी मलायकाने लाल रंगाचा डीप नेक फ्रिल गाऊन घातला होता. तसेच लाईट मेकअप आणि डिर्क लिपस्टिकमध्ये मलायका खूपच सुंदर दिसत होती. मलायकाच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोला लाईक केलं आहे. (हेही वाचा - 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेमधील मधील 'युवराज' आहे या प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा, 'फॉरेनची पाटलीण' या चित्रपटात केली महत्त्वाची भूमिका)
मलायका अरोरा इन्स्टाग्राम पोस्ट -
बॉलिवूडमध्ये सध्या मलायका व अर्जुन कपूरच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहे. मलायका गेल्या अनेक दिवसांपासून अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. लवकरच हे हॉट कपल लग्न करणार असल्याची चर्चा सुरू आहे. मागील महिन्यात मलायकाने आपल्या ड्रिंम वेडिंगचा खुलासा केला होता. माझे ड्रिम वेडिंग बीचवर होणार असल्याचंही तिने म्हटलं होतं.