'तुझ्यात जीव रंगला' मालिकेमधील मधील 'युवराज' आहे या प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा, 'फॉरेनची पाटलीण' या चित्रपटात केली होती महत्त्वाची भूमिका
Shreyas Mohite (Photo Credits: YouTube)

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला' (Tuzyat Jiv Rangla) सध्या रंजक वळणे घेत आहेत. 5 वर्ष पुढे गेलेली मालिका आणि त्यात मोठी झालेली राणा-अंजली ची मुलगी राजलक्ष्मी सध्या प्रेक्षक बरेच पसंत करत आहेत. राजलक्ष्मी पाठोपाठ आता या मालिकेत आणखी एका बालकलाकाराचे नाव प्रेक्षकांच्या तोंडावर येतय ते म्हणजे नंदिता वहिनींचा मुलगा 'युवराज' (Yuvraj). या मालिकेतील नकारात्मक भूमिका केलेले नंदिता हे पात्र बरेच गाजलं तिच्या सारख्या स्वभावाचा दाखवलेला हा युवराज नेमका कोणाचा मुलगा आहे असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर हा बालकलाकार मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा आहे ज्याने अनेक नाटकांमधून, चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

युवराज म्हणजेच श्रेयसच्या (shreyas) ख-या खु-या आयुष्यातील वडिलांचे नाव आहे संजय मोहिते (Sanjay Mohite). संजय मोहिते यांना तुम्ही अनेक चित्रपट, नाटकांतून पाहिले असेल. सोंगी भजन, हौशी नाटक, राज्यनाट्य स्पर्धां, ऑर्केस्ट्रामधून संजयने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. कोल्हापूर मधून “सोकाजीराव टांगमोरे” या नाटकाची निर्मिती केली. त्याला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. 'फॉरेनची पाटलीन, वन रूम किचन, कर्तबगार, ऑन ड्युटी चोवीस तास, नातवंड यांसारख्या ब-याच मराठी चित्रपटांत त्याने काम केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Mohite (@sanjay_mohite_) on

हेदेखील वाचा- Zee Marathi: तुझ्यात जीव रंगला मालिकेतून 'ही' अभिनेत्री घेणार एक्झिट

त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आता त्यांचा मुलगा श्रेयस मोहिते सुद्धा कलाक्षेत्रात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. श्रेयसने ‘फिनिक्स ऍक्टिंग स्कुल’ मधून अभिनयाचे धडे गिरवले आहेत. तुझ्यात जीव रंगला ही त्याची अभिनित केलेली पहिलीच मालिका आहे.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेत राजलक्ष्मी सह युवराजला प्रेक्षक बरेच पसंत करत आहेत. त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना राग येतो, याचाच अर्थ ही त्याच्या अभिनयाची पोचपावती आहे.