झी मराठी वरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेने ३ वर्षाहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या काळात राणा अंजलीची लव्ह स्टोरी, नंदिता वहिनींची कटकारस्थानं, राणाचा मृत्यू अशा अनेक रंजक गोष्टी कथानकातून दाखवण्यात आल्या.
मालिकेच्या आजवरच्या प्रवासात सर्वात जास्त गाजलेली भूमिका म्हणजे नंदिता वाहिनी. परंतु तुम्हाला हे वाचून नक्कीच धक्का बसेल की नंदिता हे पात्र लवकरच या मालिकेतून एक्झिट घेणार आहे.
अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने नंदिताची भूमिका साकारली आहे. उत्तम अभिनय कौशल्याने तिने या भूमिकेला यशस्वीरीत्या न्याय दिलं आणि प्रेक्षकांच्या घराघरात नंदिता हे पात्र पोहोचलं. नंदिता ही मालिकेतील मुख्य खलनायिका असली तरी तिच्या स्टाईलची मात्र महिलावर्गात भलतीच चर्चा होती. राणा अंजलीच्या लव्ह स्टोरीमध्ये कायमच अडथळे निर्माण करण्याचं काम तिने केलं. पण आता मालिकेचं कथानक एका वेगळ्या वळणावर जाणार असून नंदिताला मालिकेतून एक्झिट घ्यावी लागणार आहे.
धनश्रीने एका फेसबुक पोस्टद्वारे तसे तिच्या फॅन्सना सांगितले आहे. तिने मालिकेतील तिच्या शेवटच्या शॉटचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत मालिकेच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.
पहा ही पोस्ट,
या शॉटमध्ये नंदिता कोर्टात दिसत आहे आणि तिच्या अनेक गुन्ह्यांची सुनावणी होत आहे.
Happy Diwali 2019: Zee Marathi चे कलाकार सांगत आहेत त्यांचे ह्या वर्षीचे दिवाळी Plans
तसेच मालिकेत नंदिताच्या एक्झिटनंतर राणादाची मुलगी 'लक्ष्मी रणविजय गायकवाड' हिची देखील नव्याने एण्ट्री होणार आहे.