एका वर्षानंतर नाना पाटेकर पुन्हा येत आहेत प्रेक्षकांच्या भेटीला, #metoo च्या वादानंतर पहिल्यांदाच पडद्यावर
Nana Patekar | (Picture Credit: Twitter)

गेल्या वर्षभरात चित्रपटांपासून दूर असलेले नाना पाटेकर (Nana Patekar) अखेर कमबॅक करणार आहेत. पण हा चित्रपट मराठी किंवा हिंदी नसून तामिळ चित्रपट असणार आहे. त्यांचा शेवटचा चित्रपटसुद्धा तामिळच होता. 2018 साली आलेल्या काला  (Kaala) या चित्रपटात त्यांनी रजनीकांतच्या (Rajnikant) सोबत काम केले होते. या चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका केली होती.

गेल्या वर्षी आलेल्या 'मी टू' (Me too) चळवळीमध्ये अनेक कलाकारांच्या विरुद्ध आरोपांचा धडाका सुरु झाला. नाना पाटेकर ह्यांच्यावर तनुश्री दत्ताने लैंगिक शोषणाचा ठपका ठेवला आणि या चळवळीची ठिणगी पडली. नंतर अनेक कलाकारांवर, दिग्दर्शकांवर आरोप करण्यात आले. नाना पाटेकर यांना हाऊसफुल (Housefull) हा चित्रपट सोडावा लागला. तसेच त्या चित्रपटाचा दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) यालाही आपल्या कामावर पाणी सोडावे लागले. पण या प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर नाना पाटेकर आता पुन्हा चित्रपटात काम करणार का आणि करणार तर कधी करणार, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांच्या मनात निर्माण झाला. (हे वाचा. नाना पाटेकर विरुद्ध तनुश्री दत्ताची ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल)

हा चित्रपट अक्षय कुमारच्या बेबी  या चित्रपटचा तामिळ रिमेक असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटात तापसी पन्नू (Tapsee Pannu) मुख्य भूमिकेत असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटाचे नाव जन गण मन असल्याचे म्हटले जात असले तरी त्यावर अजूनही शिक्कामोर्तब झालेले नाही.