नाना पाटेकर विरुद्ध तनुश्री दत्ताची ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
तनुश्री दत्ता, नाना पाटेकर (Photo Credits: Facebook)

नाना पाटेकर विरुद्ध तनुश्री दत्ता हा वाद अधिकच चिघळण्याच्या वाटेवर आहे. काल तनुश्री दत्ताने मुंबईतील ओशिवरा पोलिस ठाण्यात नाना पाटेकर यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. २००८ साली ' हॉर्न ओके प्लिज या चित्रपटाच्या सेट्सवर नाना पाटेकरांनी तनुश्री सोबत गैर वर्तन केल्याप्रकरणी ही तक्रार नोंदवण्यात आली आहे.तक्रारीमध्ये नानांसोबत गणेश आचार्यचही नाव घेण्यात आलं आहे.

एका टेलिव्हिजन शोच्या मुलाखती मधून हा दहा वर्षांपूर्वीचा किस्सा पुन्हा बाहेर पडला. तनुश्री ने या प्रकरणी मीडियासोबत खुलासा करताना सिनेसृष्टीतील इतर कलाकारांची, मनसेच्या कार्यकर्त्यांनी गाडीची नासधूस केल्याचंही म्हटलं होतं.

 

सिनेसृष्टीतूनही या प्रकरणाबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काल नाना पाटेकर जोधपूरहून मुंबईमध्ये परतले आहे. विमानतळावर या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला आहे. मात्र लवकरच पत्रकार परिषद घेऊन नाना आपली बाजू सगळ्यांसमोर ठेवतील अशी माहिती देण्यात आली आहे.