
भीमगीते व लोकगीते लिहणारे मधूकर धुसळे (Madhukar Ghusle) यांचे निधन झाले आहे. कल्याण येथे 9 ऑगस्ट रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. धुसळे यांच्या निधनाची बातमी समजताच अनेक गीतकार, गायक आणि कलावंतांनी शोक व्यक्त केला आहे. मधुकर घुसळे हे 72 वर्षाचे असून गेल्या काही दिवसांपासून ते आजाराने त्रस्त होते. रविवारी अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात्य मुलगा सून आणि नातवंडे असा त्यांचा परिवार आहे. रात्री उशिरा कल्या पूर्वमधील विठ्ठलवाडी स्माशानभूमीत त्यांच्यावर अंत्यासंस्कार करण्यात आले आहेत.
सोनियाची उगवली सकाळ हे भिमगीत त्यांनी लिहले होते. ख्यातनाम लोकगीत व भीमगीताचे गायक आनंद शिंदे यांनी ते गायले होते. त्याचबरोबर एक वरमाई रुसली ऐन लग्नात हो जी हे गीत दिवगंत प्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांनी गायले होते. त्याचबरोबर, डोक फिरलंय, आत्ता काय लाजायचे ही लोकगीतेही त्यांनी लिहिली होती. अत्यंत गाजलेले हे गीतदेखील आनंद शिंदे यांनी गायले होते. महत्वाचे म्हणजे, हुंड्याची रित काळी हे लोकगीत त्यांनी लिहून समाजात प्रबोधन करणारी गीतेही लिहिली होती. हे देखील वाचा-Sanjay Dutt Gets Discharged: अभिनेता संजय दत्त याला मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमधून सुट्टी
वर्ष 2020 अनेकांसाठी धोकादायक ठरले आहे. या वर्षात उद्भवलेल्या कोरोनासारख्या महामारीने संपूर्ण जगाचे लक्ष्य आकर्षित करून घेतले आहे. तसेच यावर्षी अनेक कलाकारांनी आपला जीव गमवाला आहे. यातच मधूकर धुसळे यांच्या निधनाने यात आणखी भर घातली आहे.