अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याला आज (10 ऑगस्ट) मुंबईमधील वांद्रे परिसरातील लीलावती हॉस्पिटलमधून (Lilavati Hospital) डिस्चार्ज देण्यात आला आहे. 8 ऑगस्ट दिवशी श्वसनाचा त्रास होत असल्याच्या तक्रारीवरून संजय दत्त याला लीलवतीमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या काही चाचण्या झाल्या. दरम्यान यामध्ये कोविड 19 ची देखील चाचणी करण्यात आली. मात्र त्याची कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर काही तासांच्या वैद्यकीय दक्षतेनंतर त्याला आता हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आली आहे. संजय दत्तने शनिवारी (8 ऑगस्ट) दिवशी स्वतः ट्वीट करत त्याच्या हेल्थ अपडेट्सची माहिती दिली होती.
दरम्यान 61 वर्षीय संजू बाबा आज लीलावती हॉस्पिटलमधून घरी परतला तेव्हा त्याच्या चेहर्यावर मास्क होता. पॅपराझीला घराबाहेर पाहून त्यांना हात दाखवत सर्व ठीक असल्याचे संकेत दिले.
संजय दत्त
संजय दत्त हॉस्पिटलमध्ये दाखल होताच मीडियामध्ये चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र संजय दत्तने स्वतः त्याची प्रकृती ठीक असल्याचं आणि कोरोना चाचणी निगेटीव्ह असल्याचं सांगितलं. दरम्यान मीडीया रिपोर्ट्सनुसार, त्याच्या शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी झाली होती. त्यामुळे श्वसनाला त्रास होत होता. मात्र आता सुखरूप संजय दत्त बाहेर पडल्याने त्याच्या चाहत्यांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. बॉलिवूडमध्ये बच्चनकुटुंबात चौघांना कोरोनाची लागण झाली होती.
दरम्यान संजय दत्त लवकरच सडक 2 मध्ये झळकणार आहे. यासिनेमामध्ये आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूत असून या सिनेमाचा डिजिटल प्रिमियर होणार आहे.