चीनमध्ये जन्मलेला कोरोना व्हायरसने (Coronavirus) आता भारतातही (India) थैमान घालायला सुरुवात केली. भारतात आतापर्यंत कोरोना व्हायसरची लागण होऊन लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 246 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे येत्या रविवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी संपूर्म देशभरात जनता कर्फ्यूचे(Janata curfew) आवाहन केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे अनेक लोकांनी समर्थन केले आहे. यात भारताचा गायक सोनू निगम (Sonu Nigam) याचीही भर पडली आहे. सध्या सोनू निगम हा दुबईत अडकल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हे मिशन यशस्वी करण्यासाठी सोनू निगम स्वता ऑनलाईन कॉन्सर्ट घेणार असल्याचे त्याने सांगितले आहे, अशी माहिती आजतकने दिली आहे.
कोरोना व्हायरसचे देशात सध्या 246 रुग्ण असून यांची संख्या अजून वाढू नये, म्हणून सरकारकडून खबरदारीची पाऊल उचलली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. जनता कर्फ्यू दरम्यान सकाळी 7 ते रात्री 9 या दरम्यान नागरिकांना घरबाहेर पडू नका, असे सांगण्यात आले आहे. जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने देखील अनेक एक्सप्रेस रेल्वे रद्द केल्या आहेत. तसेच मुंबईची लाईफलाईन म्हणजेच लोकल रेल्वेही रद्द करण्यात आल्या आहेत. यातच सोनू निगम सध्या दुबईत आहे. इच्छा असूनसुद्धा कोरोना व्हायरसच्या थैमानामुळे तो भारतात परतू शकला नाही. सोनू निगम यानीही बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्रे मोदी यांच्या जनता कर्फ्यूचे समर्थन केले आहे. तसेच नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला यशस्वी आणि प्रभावी बनवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. हे देखील वाचा- Janata Curfew ला मुंबई मेट्रो कडून समर्थन; 22 मार्चला दिवसभर बंद राहणार सुविधा
कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील कोरोना बाधीतांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रात शुक्रवारपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 वर होती. मात्र, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आणखी 11 रुग्णांची भर पडली असून एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 63 वर पोहचली आहे. दरम्यान, मुंबई येथे 10 तर, पुण्यात 1 रुग्ण आढळल्याचे त्यांनी सांगितले. यांपैकी 8 जण परदेशातून भारतात आलेले आहेत. तर, 3 जण संसर्गातून कोरोनाबाधित झाले आहेत.