Mumbai Metro | Representational Image | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रासह देशभरात उद्या (22 मार्च) रविवार दिवशी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान यामध्ये मुंबई मेट्रोने सहकार्य करण्यासाठी एक पाऊल उचललं आहे. यामध्ये 22 मार्च दिवशी मुंबई मेट्रो बंद राहणार आहे. मुंबई मेट्रो ही घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान सेवा देते. उद्या अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवर मुंबई मेट्रोची सेवा खंडीत करण्यात आली आहे. सध्या देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 270 च्या वर गेला आहे. तर सर्वाधिक रूग्ण 63 हे महाराष्ट्र राज्यात आहेत. त्यामुळे आता कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी अनावश्यक गर्दी आणि प्रवास टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबई: येत्या 22 मार्चला ठेवण्यात आलेल्या 'जनता कर्फ्यू' मध्ये आवश्यकतेनुसार सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार.

महाराष्ट्रात कोरोनाचा व्हायरसचा विळखा वाढत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामध्ये रेल्वे कडूनही काही गाड्यांच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहे. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार, 22 मार्च दिवशी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत नागरिकांनी बाहेर पडू नये. तसेच 5 वाजता आपापल्या घराच्या खिडकी, बाल्कनी मध्ये येऊन सरकारी यंत्रणा, डॉक्टर, नर्स यांचे आभार मानावेत असे आवाहन करण्यात आले आहे. Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 63 वर; राज्यात देशातील सर्वाधिक रुग्ण.

मुंबई मेट्रो ट्वीट

चीनमधून जगभरात पसरलेला कोरोना व्हायरस आता जगभरात थैमान घालत आहे. दरम्यान इटली, स्पेन प्रमाणे भारतात कोरोना व्हायरस बाधितांच्या संख्येत स्फोट होऊ नये म्हणून प्रत्येकाला सोशल डिस्टन्सिंगचा पर्याय सूचवला जात आहे. त्यानुसार राज्यात 31 मार्च पर्यंत काळजी घेण्याचं कळकळीचं आवाहन राज्य सरकार कडून करण्यात येत आहे.