Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) महाराष्ट्र राज्यात प्रवेश केल्याने हळूहळू आपले प्रस्थ वाढवायला सुरुवात केली आहे. देशातील सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण महाराष्ट्रात असून त्यात अजून नव्या रुग्णांची भर पडली आहे. पुण्यात कोरोनाचे आणखी दोन रुग्ण सापडल्याने आता पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 23 झाली आहे. या दोन रुग्णांपैकी एक रुग्ण आर्यलँड (Ireland) हून परत आला होता. तर दुसरा रुग्ण स्थानिक आहे, अशी माहिती पुण्याचे जिल्हा दंडाधिकारी नवल के. राम यांनी दिली आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार सज्ज असून 31 मार्चपर्यंत मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये जीवनावश्यक सेवा वगळता सारं काही बंद राहणार आहे. तसंच उद्या 22 मार्च रोजी देशात 'जनता कर्फ्यू' पाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून करण्यात आले आहे. (Coronavirus In India: कोरोना व्हायरसग्रस्तांचा भारतातील आकडा 258)

ANI Tweet:

कालपासून कोरोनाचे 11 नवे रुग्ण सापडले असून महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या आता 63 झाली आहे.

PTI Tweet:

कोरोनाचा संसर्ग हा खोकला, शिंक, थुंकी यातून होत असल्याने वैयक्तिक स्वच्छतेबरोबच सार्वजनिक स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे खोकताना, शिंकताना नाका-तोंडावर रुमाल धरा. रस्त्यावर थुकू नका, अशा सूचना आरोग्य विभागाकडून वारंवार देण्यात येत आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रस्त्यावर थुंकणे टाळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून BMC 1000 रुपये दंड आकारणार आहे.