कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी येत्या 22 मार्चला भारतात सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत 'जनता कर्फ्यू' ठेवण्यात आला आहे. या वेळेत संपूर्ण देश 'Lockdown' करण्यात आला आहे. त्यामुळे लोकांना या काळात घराबाहेर पडू नये असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यात सर्व रिक्षा (Rickshaw), टॅक्सी (Taxi) वाल्यांनी देखील पाठिंबा दर्शविला असला तरीही मुंबईत (Mumbai) गरजेनुसार रिक्षा सेवा सुरु राहिल असे सांगण्यात आले आहे. TOI ने याबाबत वृत्त दिले आहे. 'आम्ही कोणत्याही प्रकारचा बंद पुकारला नसून रिक्षा चालक आवश्यक असल्यास 21 आणि 22 मार्चला रिक्षा सुरु ठेवू शकतात' असे मुंबई रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शशांक राव (Shashank Rao) यांनी सांगितले आहे.
येत्या 22 मार्चला ठेवण्यात आलेल्या 'जनता कर्फ्यू' नुसार, संपूर्ण देश बंद ठेवण्यात आला आहे. लोकांनी घराबाहेर न पडता घरात राहून कोरोना व्हायरस विरोधात राबविण्यात आलेल्या या मोहिमेला पाठिंबा दर्शवावा असे आवाहन नरेंद्र मोदी यांना तमाम देशवासियांना केला आहे. Coronavirus: प्रसंग कोणताही असो, नागरिकांनी गर्दी टाळा: अजित पवार
अशा वेळी रिक्षाचालकांप्रमाणे केवळ 15% टॅक्सी चालक 22 मार्चला रस्त्यांवर दिसतील. गरजेनुसार या दिवशी टॅक्सी चालविण्याचा निर्णय टॅक्सी चालक संघटनेचे अध्यक्ष ए.ल.क्युड्रोज (A.L.Qudros)यांनी सांगितले आहे. तसेच आमचे बहुतांश टॅक्सीचालक हे गावाला गेले असून अनेक जण घरीच बसणार आहे. म्हणून आम्ही टॅक्सीचालकांना विनंती करत आहोत की त्यांनी आम्हाला रस्त्यावर टॅक्सी लावण्याची परवानगी द्यावी असे सांगितले आहे. CM Uddhav Thackeray on Coronavirus: मुंबई, पुणे, पिंपरी, नागपूर मध्ये जीवनावश्यक सेवा सोडून सर्व खाजगी कंपन्या 31 मार्च पर्यंत राहणार बंद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोना व्हायरस संकटाचा सामना मोठ्या धीराने करायला हवा - पंतप्रधान
कोरोना व्हायरस संकटाचा सामना मोठ्या धीराने करायला हवा. कोरोना हे संकट सामान्य नाही. त्याला गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. जगभरातील कोरोना संक्रमीत देशांवर आमचे बारीक लक्ष आहे. जगभरात कोरोना संक्रमीत नागरिकांची संख्या प्रचंड मोठी आहे. म्हणूनच भारतानेही कोरोना व्हायरस नियंत्रित करण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यायला हवी. कोरोनाचा परिणाम भारतावर होणार नाही, असे म्हणने हा केवळ भ्रम आहे, अशा स्पष्ट शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सीओव्हीआयडी-19 (COVID-19) बाबत गांभीर्य ध्यनात आणून दिले. अनेक सूचना देतानाच पंतप्रधानांनी नागरिकांना काळजी घेण्याचे अवाहनही केले.