मुख्यमंत्री उद्धव ठाकरे । Photo Credits: PTI

CM Uddhav Thackeray on Coronavirus:  महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus)  रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊन आज ही संख्या 52 वर पोहचली आहे, याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) सुद्धा सोबत होते.  लोकल किंवा बस मध्य ज्या कारणासाठी गर्दी होते ते कारण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असेही ठाकरे म्हणाले. यापुढील काही दिवस सरकारी कर्मचाऱ्यांची क्षमता ही 50% ऐवजी 25 % इतकी कमी केली जाईल तर सर्व खाजगी कंपन्या बंद ठेवण्यात याव्यात असे आदेश ठाकरे यांनी दिले आहेत.  हे आदेश मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपुर सहित सर्व मुख्य शहरात लागु  होतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह इथे पाहा

दुसरीकडे मुंबई लोकल (Mumbai Local) आणि बस (BEST) बंद करण्याच्या मागणीवर उद्धव ठाकरे यांनी उत्तर देत मुंबईच्या लोकल मध्ये, बस मध्ये प्रचंड गर्दी होते हे जरी मान्य केलं तरी या सेवा मुंबईच्या लाईफलाईन आहेत, या सेवा बंद केल्यास महापालिका कर्मचारी, आपत्कालीन सेवा देणारे कर्मचारी, यांना प्रवास करण्याचा मार्ग उरणार नाही त्यामुळे या सेवा बंद करता येणार नाहीत असे स्पष्ट केले.

पहा ट्विट

उद्धव ठाकरे यांनी आजच्या लाईव्ह मध्ये सांगितलेले महत्वाचे निर्णय

-राज्य सरकारी कार्यालयात 50 % उपस्थिती ऐवजी 25 % कर्मचारी कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

-जीवनावश्यक वस्तू सोडून सर्व दुकाने आणि ऑफिस बंद करण्यात येत आहे.

-आम्ही ऑफिसेसना वर्क फ्रॉम होम च्या सुविधा देण्यासाठी सांगितले होते, ज्या ठिकाणी हे शक्य नाही तिथे सक्तीने सर्व काही बंद करण्यात येणार आहे.

- ज्या कर्मचाऱ्यांचे रोजच्या कामावर वेतन आहे त्यांचे वेतन माणुसकीच्या नात्याने मालकांनी कापू नये असे आवाहन सुद्धा ठाकरे यांनी केले आहे.

- मुंबई लोकल किंवा बस सेवा या लाईफलाईन असल्याने बंद करता येणार नाहीत. मात्र आज नंतर अजूनही गर्दी कायम राहिली तर नाईलाजाने हा निर्णय शुद्ध घ्यावा लागेल असे ठाकरे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा देशवासियांना येत्या रविवारी म्हणजेच 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. यानुसार सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत सर्व नागरिकांनी घरी राहावे असे सांगण्यात आले आहे. कोरोनाविरुद्ध सध्या जागतिक युद्ध सुरु आहे याला उत्तर देण्यासाठी घरात राहणे गरजेचे आहे, तिला फिरण्याची सुट्टी समजू नये असे आवाहन ठाकरे यांनी नागरिकांना केले.