CM Uddhav Thackeray Facebook Live: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह इथे पाहा; कोरोना व्हारस संकटाबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता
CM Uddhav Thackeray Facebook Live | Photo Credits: Facebook)

CM Uddhav Thackeray Facebook Live: कोरोना व्हारसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) महाराष्ट्राला आज पुन्हा एकदा संबोधित करत आहेत. फेसबुक लाईव्ह (Facebook Live) आणि इतर प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मुख्यमंत्री जनतेला संबोधित करत आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी कालही (19 मार्च) महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून भाषण केले होते. या वेळी त्यांनी कोरोना व्हायरसला जागतिक युद्धाची उपमा दिली होती. आजच्या फेसबुक लाईव्हमध्ये ते काय घोषणा करतात याकडे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह

उद्धव ठाकरे यांनी काल जनतेले उद्देशून केलेल्या भाषणात कोरोना व्हायरस संकट हे जागतिक युद्ध असल्याचे म्हटले होते. कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी कार्यरत असलेले सरकारी कर्मचारही, डॉक्टर, परिचारिका आणि संस्था या सर्व एका सैनिकाप्रमाणेच काम करत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी या वेळी सांगितले. होते. (हेही वाचा, Coronavirus: राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 वर पोहचली, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती)

कालच्या संबोधनात उद्धव ठाकरे यांनी जनतेचेही कौतुक केले. मात्र, हे कौतुक करताना काही नागरिकांकडून राज्य सरकारच्या सूचनांचे उल्लंघन कळत, नकळत केले जात आहे त्याबाबत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, आजच्या फेसबुक लाईव्हमध्ये उद्धव ठाकरे काय बोलतात याबाबत उत्सुकता आहे. आजच्या भाषणात उद्धव ठाकरे काही महत्त्वाचे निर्णय घेणार असल्याचे समजते.