राजेश टोपे (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता दिवसेंदिवस नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 49 वरुन आता 52 वर पोहचली असल्याचे स्पष्ट केले आहे. तर राज्यात कोरोनाचे 3 नवे पॉझिटिव्ह आमि 971 रुग्ण हे निगेटिव्ह असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे. तर दुपारी 12.30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत.गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधत येत्या 22 मार्चला जनता कर्फ्यू असणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राजेश टोपे यांनी सुद्धा राज्यातील नागरिकांना येत्या रविवारचा कर्फ्यू 100 टक्के पाळा असे आवाहन केले आहे.

राज्यात डायग्नोस्टिक सेंटर वाढवणार असून प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राकडून मदतीची अपेक्षा राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. तर आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. दुसऱ्या बाजूला पाच कोरोनाचे रुग्ण डिस्चार्जच्या मार्गावर असल्याचे ही टोपे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.खासगी रुग्णांन क्वारंटाईनची व्यवस्था आणि कोरोना किटची संख्या सुद्धा वाढवण्यात येणार आहे. सरकारकडून वारंवार कोरोनाबाबत उपाययोजना केल्या जात आहे. पण नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.(Coronavirus: पुणे येथे कोरोना व्हायरसमुळे होलसेल फळभाज्यांचे मार्केट बंद)

तर मुंबईत लॉकडाऊनची स्थिती काही ठिकाणी दिसून येत आहे. तर दादर मार्केट मधील व्यापाऱ्यांकडून 100 टक्के लॉकडाऊन दिसून येत आहे. तसेच गुढीपाडव्याला सर्व दुकान बंद ठेवण्यात येतील असा निर्णय दादर व्यापारी संघटनेने घेतला आहे. तसेच पुण्यात सुद्धा होलसेलचे फळभाज्या मार्केट बंद ठेवण्यात आले आहे.