पुणे होलसेल फळभाज्या मार्केट बंद (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रात कोरोना व्हारसचा शिरकाव झाला असून त्याच्या रुग्णांचा आकडा 48 वर पोहचला आहे. तर भारतात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 149 वर गेला आहे. त्यामुळे नागरिकांना वारंवार काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ऐवढेच नाही तर स्थानिक सरकार, प्रशासनाकडून नागरिकांसाठी काही नियमावली सुद्धा जारी केली आहे. तर पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने तेथील शाळा-महाविद्यालये, हॉटेल्ससह अन्य ठिकाणी बंद पाळण्यात आला आहे. तसेच पुण्यातील होलसेल फळ आणि भाज्यांचे मार्केट सुद्धा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यातील गुलटेकडी येथील फळ आणि भाज्यांचे मार्केट बंद ठेवण्यात आले आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी हा एकत्रितपणे निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी भाज्या आणि फळे मार्केट बंद राहणार असल्याचे नोंद घ्यावी असे सांगण्यात आले आहे. दरम्यान पुणे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार आता पुणे शहरात 4 पेक्षा अधिक लोकं एकत्र जमू नये याची खात्री करण्यासाठी पुणे शहर पोलिस आणि पिंपरी चिंचवड पोलिस सज्ज झाले आहेत.(Coronavirus: महाराष्ट्र परिवहन सेवा बंद करण्याचा निर्णय नाही: परिवहन मंत्री अॅड. अनिल परब)

दुसऱ्या बाजूला मुंबईत सुद्धा लॉकडाऊनची स्थिती काही ठिकाणी दिसून येत आहे. तर दादर मार्केट मधील व्यापाऱ्यांकडून 100 टक्के लॉकडाऊन दिसून येत आहे. तसेच गुढीपाडव्याला सर्व दुकान बंद ठेवण्यात येतील असा निर्णय दादर व्यापारी संघटनेने घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर स्वत:ची काळजी घेण्यासोबत गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळल्याचे दिसून येत आहे.