Shakira and Gerard Pique Breakup: कोलंबियाची पॉप स्टार गायिका शकीरा (Shakira) आणि तिची जोडीदार स्पॅनिश फुटबॉलर जेरार्ड पिक (Gerard Pique) वेगळे झाले असून त्यांचे 12 वर्षांचे नाते संपुष्टात आले आहे. शनिवारी दोघांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. शकीरा हे जागतिक संगीत क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. 'हिप्स डोंट लाय' आणि 'वाका-वाका' ही त्यांची लोकप्रिय गाणी आहेत. दोघांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे, आम्ही वेगळे होत आहोत हे कळवताना आम्हाला खेद वाटतो. हा निर्णय आम्ही आमच्या मुलांसाठी घेतला आहे. त्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आमच्या गोपनीयतेचा आदर केला जावा, अशी आमची इच्छा आहे. शकीराने पिकवर दुसऱ्या महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये असून आपली फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पिकचे दुसऱ्या महिलेसोबत अफेअर आहे. यानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.
शकीरा आणि पिक हे हॉलिवूडमधील सर्वात प्रिय जोडप्यांपैकी एक मानले जात होते. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकापासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर फुटबॉल वर्ल्ड कपच्या 'वाका-वाका' थीम साँगमध्येही दोघे एकत्र दिसले होते. (हेही वाचा - Kartik Aaryan Tests Positive for COVID-19: कार्तिक आर्यनला दुसऱ्यांदा कोरोना व्हायरसची लागण; IIFA Awards मध्ये सहभागी होणार नाही)
दरम्यान, 35 वर्षीय पिक स्पेनशिवाय प्रसिद्ध क्लब बार्सिलोनाकडूनही खेळतो. पिकने स्पेनकडून खेळताना 2010 विश्वचषक आणि 2012 युरोपियन चॅम्पियनशिप जिंकली आहे. याशिवाय त्याने क्लब बार्सिलोनासोबत तीन वेळा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपदही जिंकले आहे. पिक आणि शकीराने लग्न केले नाही. या दोघांच्या वयात 10 वर्षांचा फरक आहे. पिक शकीरापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. त्यांना दोन मुले (शाशा पिक मेबारक आणि मिलन पिक मेबारक) देखील आहेत.
पिक सध्या बार्सिलोनाच्या कॅल मुंटानेरमध्ये शकीराशिवाय एकटा राहतो. स्पॅनिश वृत्तपत्र एल पेरिओडिकोच्या रिपोर्टनुसार, शकीराने स्पॅनिश फुटबॉलपटू पिकला अन्य एका महिलेसोबतच्या प्रेमसंबंधात रंगेहाथ पकडले. पिक सध्या त्याच्या एका महिला मैत्रिणीसोबत लाइफ एन्जॉय करत आहे. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, या महिलेला पिकच्या घरी येता-जाताना अनेकवेळा पाहण्यात आलं आहे.
पिकने 2021-21 मध्ये बार्सिलोनासाठी सर्व प्रकारच्या स्पर्धांसह 41 सामने खेळले. सध्या, प्रशिक्षक झेवी चेल्सीच्या नामांकित बचावपटूंपैकी एक, अँड्रियास क्रिस्टियनसेनला क्लबमध्ये आणण्याचा विचार करत आहेत.