Toofan च्या शूटिंग वेळी Farhan Akhtar च्या हाताला झाले फ्रॅक्चर; Instagram वर फोटो केला शेयर
Farhan Akhtar | (Picture Credit: Twitter)

काही दिवसांपूर्वी फरहान अख्तरच्या (Farhan Akhtar) 'तुफान' (Toofan) चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं आणि सोशल मीडियावर व्हायरल झालं. या चित्रपटात फरहान एका बॉक्सरची भूमिका करतो आहे. त्यासाठी शूटिंग करत असतानाच फरहानचा हाताला दुखापत झाली. नंतर क्स रे मध्ये हेयरलाईन फ्रॅक्चर असल्याचं निष्पन्न झालं. त्याने हाताच्या X Ray चा फोटो त्याच्या इंस्टाग्रामवर शेयर देखील केला आहे.

आपल्या पोस्ट मध्ये फरहान म्हणतो, " होय, ही माझी पहिली अधिकृत बॉक्सिंग इंज्युरी आहे. हाताला झालेलं हेयरलाईन फ्रॅक्चर."(हेही वाचा. Farhan Akhtar याच्या Girlfriend चे 'हे' Sexy फोटो सोशल मीडियावर होत आहेत वायरल (Photos)

 

'तुफान' हा चित्रपट 2020 साली गांधी जयंतीच्या दिवशी प्रदर्शित होतो आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केलेलं आहे. तब्बल 6 वर्षांनंतर दोघंही एकमेकांसोबत काम करत आहेत. या आधी भाग मिल्खा भाग हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट त्यांनी केलेला शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटात परेश रावल, मृणाल ठाकूर, इशा तलवार यांच्या सहाय्य्क भूमिका आहेत.