Happy Birthday Taimur: सैफ अली खान आणि करीना कपूर खानचा छोटा नवाब तैमूर अली खान अगदी जन्मापासूनच चर्चेत राहिला आहे. त्याचा एक वेगळा चाहता वर्गच आहे जो रोज तैमूरचे नवीन फोटो पाहण्यासाठी आतुर असतो. त्याचा नवीन कोणताही फोटो सोशल मीडियावर आला तरी तो लगेचच संपूर्ण इंटरनेटवर व्हायरल होतो. या व्हायरल होणाऱ्या तैमूरच्या फोटोंवर हजारो लाइक्स आणि कॉमेट्सचा पाऊस पडत असतो. इतकंच काय तर न्यूज चॅनलची देखील तो नेहमीच पसंती असतो. त्यामुळेच तैमूर हा सर्वात जास्त लोकप्रिय स्टार किड्स पैकी एक आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.
फॅन फॉलोईंगच्या बाबतीत तैमूर एखाद्या सेलेब्रिटीला देखील मागे टाकेल. आजचा दिवस या स्टार किडसाठी खूपच स्पेशल आहे, कारण आज त्याचा वाढदिवस आहे. यावर्षी तो तीन वर्षांचा होणार आहे. आणि आजच्या दिवशी त्याच्यासाठी एका खास पार्टीचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या पार्टीची थीम ख्रिसमसवर आधारित असणार आहे. त्याच्या बर्थडेचे फोटो तर येतीलच पण त्या आधी आजच्या या खास दिवशी पाहूया तैमूरचे काही गोंडस फोटो.
दरम्यान, फोटोग्राफर्स तैमूरच्या एका फोटोसाठी तब्बल 1500 रुपये आकारतात. सैफ अली खानाने स्वतः एका मुलाखतीदरम्यान हा गौप्यस्फोट केला होता. विशेष म्हणजे कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटीच्या फोटोपेक्षा ही रक्कम जास्त आहे, असंही सैफ त्या मुलाखतीत म्हणाला.